March 19, 2025 7:41 PM

views 55

रंगपंचमीचा सण राज्यात उत्साहाने साजरा

रंगपंचमीचा सण आज राज्यात उत्साहाने साजरा झाला. ठिकठिकाणी मंदिरांमधे देवमूर्तींना रंग लावण्यात आला, तर जागोजाग तरुणाईने रंग खेळण्याचा आनंद लुटला. नाशिकच्या पारंपरिक रंगोत्सवासाठी शहरात सात ठिकाणच्या पेशवेकालीन रहाडी म्हणजेच हौद खुले करण्यात आले. शहराच्या मध्य भागातल्या राहाडीमध्ये उत्सव साजरा झाला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अनेक ठिकाणी भेट देऊन रहाडींचे औपचारिक पूजनही केले.   अहिल्यानगर जिल्ह्यात मढी इथं नाथ संप्रदायातल्या संत कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मो...

March 14, 2025 3:27 PM

views 63

देशभरात होळीच्या सणाचा उत्साह

देशभरात आज धूलिवंदन आणि होळी उत्साहाने साजरी होत आहे. होळीचा सण हा ऋतुराज वसंताच्या आगमनाचं प्रतीक मानला जातो. होळीच्या दिवशी चांगल्याचा वाईटवरचा विजय म्हणून होलिका दहन केलं जातं आणि त्यानंतर रंगांची उधळण केली जाते.   देशभरात विविध ठिकाणी हा सण विविध पद्धतीने साजरा होतो. महाराष्ट्रात काल जागोजाग होळ्या पेटवून पारंपरिक पद्धतीने होळी साजरी झाली. मुंबई, ठाण्यात आज धुळवड खेळली जात आहे. गुजरातमध्ये द्वारकेत द्वारकाधीश मंदिरासह अन्य श्रीकृष्ण मंदिरांमध्ये फागुनी पूनम आणि फुलडोल उत्सव साजरा होत आह...

March 13, 2025 2:58 PM

views 76

होळीचा सण जबाबदारीनं साजरा करण्याचं मुंबई पालिकेचं आवाहन

मुंबईकरांनी होलिका दहन आणि धूलिवंदन हे सण आनंदानं आणि जबाबदारीनं साजरे करावेत. होलिका दहनासाठी वृक्षतोड करू नये, तसंच प्रदूषण टाळण्यासाठी रंगवलेलं लाकूड, प्लास्टिक, रबर, टायर अश्या वस्तू होळीत टाकू नये, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.   रंगांचा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्‍यावी, पाण्याचा अपव्‍यय टाळावा, पर्यावरणपूरक आणि त्वचेसाठी सुरक्षित असलेले  नैसर्गिक रंग वापरावेत, अशी सूचनाही पालिकेनं दिली आहे.