September 30, 2025 7:47 PM

views 68

‘स्वस्थ नारी , सशक्त परिवार’ उपक्रमा अंतर्गत हिंगोलीत शिबीरं

‘स्वस्थ नारी , सशक्त परिवार’ उपक्रमा अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात आज 530 महिला आणि  60 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. वसमत, औंढा, कळमनुरी इथलं उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, आणि ग्रामीण रुग्णालयातही हा उपक्रम राबवण्यात आला. 

July 28, 2025 7:04 PM

views 62

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ

हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.  नामांकन भरण्याच्या पहिल्याच दिवशी ७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.  ३० ऑगस्ट रोजी मतदान होणार असून ३१ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे .

July 19, 2025 3:50 PM

views 61

रूपाली चाकणकर यांनी हिंगोली इथल्या सखी वन स्टॉप सेंटरला दिली भेट

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हिंगोली इथल्या सखी वन स्टॉप सेंटरला भेट दिली. पीडित महिलांनी आणि विद्यार्थिनीनी या मदत केंद्राची मदत घेऊन आपले प्रश्न सोडवावेत असं आवाहन यावेळी चाकणकर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

March 7, 2025 8:05 PM

views 85

हिंगोलीतले संशोधक पुष्यमित्र जोशी यांची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड

हिंगोली जिल्ह्यातले तरुण संशोधक पुष्यमित्र जोशी यांची भारत सरकारच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जोशी यांचं विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरणीय धोरण आणि सामाजिक कार्यातलं योगदान लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. १५ ते २९ वर्ष वयोगटात विज्ञान, समाजसेवा, नवोन्मेष, नेतृत्व, संशोधन आणि धोरण अशा क्षेत्रात  असाधारण कार्य करणाऱ्या युवक युवतींना, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत एका विशेष कार...

February 18, 2025 3:26 PM

views 63

हिंगोलीत ग्रामसेवक संघटनेचं असहकार आंदोलन

हिंगोली जिल्ह्यातल्या ग्रामसेवक संघटनेने आजपासून असहकार आंदोलन सुरू केलं आहे. मागच्या पाच वर्षांपासून रखडलेले आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरित करावेत, प्रगती योजनेचा लाभ द्यावा, डोंगरकडा इथल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या कामाचं मूल्यांकन करावं, वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयकं तातडीने निकाली काढावीत, मुद्रांक शुल्काची परिपूर्ण माहिती द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या कुठल्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही असा इशारा ग्रामसेवक संघटनेचे जिल...

January 2, 2025 10:14 AM

views 46

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाअंतर्गत हिंगोली आणि नांदेडमध्ये वाचन उपक्रमांचं आयोजन

“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं काल जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस. एम. रचावाड यांच्या हस्ते उद्घाटन झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज सामूहिक ...

November 24, 2024 3:38 PM

views 58

हिंगोलीत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद

राज्य विधानसभा निवडणूक निकालानंतर काल हिंगोलीत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला झालेल्या या घटनेत पाच जण जखमी झाले. या गोळीबारात संतोष बांगर यांच्या पुतण्याला गोळी लागल्याची माहिती आहे. त्याला हैदराबाद इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी हिंगोली पोलीस ठाण्यात ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

November 10, 2024 8:58 AM

views 67

बीड आणि हिंगोली इथं गृह मतदानाला सुरुवात

बीड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला काल सुरुवात झाली. ८५ वर्षांवरील, दिव्यांग असलेल्या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकाद्वारे मतदान घेण्यात येत आहे. या मतदारसंघात एकूण ३०७ नागरीक गृह मतदान करणार असून, आजपर्यंत हे मतदान चालेल. यासाठी एकूण २२ पथकं नेमण्यात आली आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघातही गृह मतदान सुरु झालं असून, यासाठी १८ पथकं रवाना करण्यात आली आहेत.

November 9, 2024 5:03 PM

views 48

एनसीसीएफच्या वतीने खरीप हंगाम २०२४-२५ साठी मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र हिंगोलीत सुरु

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत एनसीसीएफच्या वतीने खरीप हंगाम २०२४-२५ साठी मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र हिंगोलीत सुरु करण्यात आली आहे. या खरेदी केंद्रांवर मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी १ ऑक्टोबर पासून नोंदणी सुरु झाली आहे. या केंद्रावर ७ जानेवारी पर्यंत मूग आणि उडीद तर १२ जानेवारी पर्यंत सोयाबीन खरेदी सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातल्या केंद्रावर संपर्क करुन नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केलं आहे.

November 9, 2024 4:49 PM

views 47

शरद पवार यांनी आज हिंगोली इथं प्रचारसभेला संबोधित केलं

महाराष्ट्रात यावेळी निवडणूक लढवणाऱ्या पक्षांची आणि उमेदवारांची संख्या जास्त असून त्यामुळे उमेदवारांचा कस लागणार असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. आज एका वृत्तवाहिनीला ते मुलाखत देत होते. शरद पवार यांनी हिंगोली इथं प्रचारसभेला संबोधित केलं. तसंच ते आज बीडमध्ये परळी आणि आष्टी इथं सभांना संबोधित करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे यवतमाळ इथं प्रचारसभा घेणार आहेत.