October 29, 2024 7:52 PM

views 49

हिजबुल्लाहचा नवा प्रमुख म्हणून नईम कासीमच्या नावाची घोषणा

हिजबुल्लाहचा नवा प्रमुख म्हणून या संघटनेच्या संस्थापक सदस्य असलेल्या नईम कासीम च्या नावाची घोषणा हिजबुल्लाहनं केली आहे. ७१ वर्षांचा कासीम या संघटनेत १०९१ पासून उपसरचिटणीस म्हणून काम करत आहे. महिन्याभरापूर्वी इस्रायलनं केलेल्या बॉम्बहल्ल्यात मारला गेलेल्या हसन नसरल्लाह ची जागा आता कासीम घेईल.  १९९७ मधे अमेरिकेनं हिजबुल्लाहला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. त्यानंतर आतापर्यंत ६० पेक्षा जास्त देश आणि संघटनांनी हिजबुल्लाहला अंशतः किंवा पूर्णपणे दहशतवादी गट म्हणून घोषित केलं आहे.

October 3, 2024 1:29 PM

views 72

दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लासोबत झालेल्या संघर्षात इस्रायलचे ८ सैनिक ठार

दक्षिण लेबनॉनमध्ये काल हिजबुल्लासोबत झालेल्या संघर्षात इस्रायलचे आठ सैनिक ठार झाल्याचं इस्त्रायलच्या सैन्यानं सांगितलं आहे. इस्रायलनं सैनिकी कारवाई केल्यानंतर उत्तरादाखल हिजबुल्लानं हा हल्ला केला. एका व्हिडिओ संदेशात इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी याबाबत शोक व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, या हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल. इराणलाही याचे परिणाम भोगावे लागतील. इस्रायलची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचही त्यांनी वचन दिलं. इस्रायली हवाई दलाने बैरूतच्या दक्षिणेकडील उपनगरातील ह...

September 23, 2024 8:24 PM

views 57

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार झाले असून ७२७ जण जखमी झाले आहेत. यात बालकं, महिला, आणि आरोग्यसेवकांचा समावेश असल्याचं लेबननच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. लेबननमधल्या ३०० ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती इस्रायली सैन्यानं दिली आहे.    दुसऱ्या बाजूला, हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेनं इस्रायलच्या उत्तर भागातल्या लष्करी तळांवर आणि रसद गोदामांवर क्षेपणास्त्र डागली आहेत. इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं हिजबुल्लाहनं म...

August 25, 2024 8:15 PM

views 100

इस्रायलवर हिजबुल्लाह संघटनेकडून क्षेपणास्त्रांचा हल्ला

हिजबुल्लाह या लेबनॉनमधल्या दहशतवादी संघटनेनं आज सकाळी इस्रायलवर हल्ला सुरू केला. त्यांचा लष्करी नेता फौद शुकुर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला असल्याचं हिजबुल्लाहनं म्हटलं आहे. ३० जुलै रोजी बैरुत इथं शुकुर याची हत्या झाली होती. हिजबुल्लाहनं इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.     दरम्यान, हिजबुल्लाहनं हल्ला करण्याआधीच आपण शंभर लढाऊ विमानांच्या सहाय्यानं हल्ला केल्याचं इस्रायली लष्करानं म्हटलं आहे. हिजबुल्लाहनं इस्रायलवर मोठ्या हल्ल्याची योजना आखल्याचं लक्षात आल्यामुळ...