July 25, 2024 7:19 PM

views 63

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत करावी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

राज्यात अतिवृष्टीमुळं हजारो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून अतिवृष्टीमुळं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत करावी, अशी मागणी विधानसभेतला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.   अलमट्टी धरणामुळं कोल्हापूर, सांगली या शहरांना पुराचा धोका होऊ नये, यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली आ...

July 23, 2024 8:05 PM

views 55

कोल्हापुरात पावसाची बॅटींग, पंचगंगा नदी दुथडी भरून वाहली

कोल्हापुरात पावसाची संततधार सुरू असल्यानं पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. राधानगरी धरण ९० टक्के भरलं आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात. त्यामुळे जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. कोयना धरणातून १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.   गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी विविध धरणांमधून मोठा विसर्ग होत असल्यानं अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जिल्ह्यातल्या २० मार्गांवरची ...

July 20, 2024 8:03 PM

views 61

चीन : मुसळधार पावसामुळे पूल नदीत कोसळून ११ जणांचा मृत्यू

चीनच्या उत्तरेकडे मुसळधार पावसामुळे महामार्गावरील पूल नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. शान्क्सी प्रांतात काल रात्री हा अपघात घडला. बचावकार्य सुरू आहे. महामार्गावरची सुमारे २० वाहनं आणि ३० जण या दुर्घटनेनंतर बेपत्ता आहेत.

July 20, 2024 2:49 PM

views 68

रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी

महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागानं रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावतीमध्ये जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्यानं चाकरमान्यांची तारांबळ उडाली.

July 20, 2024 10:29 AM

views 63

गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे पुरस्थिती, जनजीवन विस्कळीत

गुजरातमध्ये, सौराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, राज्यातील सुमारे 57 गावांना पुराचा फटका बसला आहे. देवभूमी द्वारका आणि पोरबंदर हे दोन जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले असून इथे गेल्या 36 तासांत 20 इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.     राज्य आणि केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या दहा तुकड्या पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आहेत. पुरा...

July 19, 2024 7:38 PM

views 62

राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी

कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर जोरदार पाऊस सुरु आहे. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड आणि शाहूवाडी तालुक्यात धुवांधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातली चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली असून, धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातल्या नद्यांवरचे ७४ बंधारे पाण्याखाली गेले असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून प्रशासनानं नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.   गडचिरोली जिल्ह्यात गेले दोन ...

July 18, 2024 3:47 PM

views 56

राज्यात विविध भागात पावसाचा जोर

राज्याच्या विविध भागांत पावसानं जोर धरला आहे. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली.  शहरातले रस्ते आणि पुलांवर पाणी साचल्यामुळे आज सकाळी अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी दिसून आली, मात्र सर्व उपनगरी रेल्वे मार्गांवरची सेवा सुरळीत सुरु आहे.    रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारपासून पावसानं पुन्हा जोर धरला असून, आजही तो कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस झाला आहे. खेड मधली जगबुडी आणि लांज्यातली काजळी या नद्या धोक्याच्या पातळी वरून वाहत आहेत.    सिंधुदुर्ग जि...

July 18, 2024 3:42 PM

views 53

येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तसंच कोकणात  बहुतांश  ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  कोकण  किनारपट्टीवर जोरदार  वारा वाहण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.

July 18, 2024 11:41 AM

views 50

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा

गोंदिया जिल्ह्यामध्ये दमदार पावसामुळं भात पिकाला मोठा लाभ झाला आहे. भंडारा जिल्ह्यात काल बऱ्याच प्रतीक्षेनंतर जोरदार पावसानं हजेरी लावली. पवनी तालुक्यातील कोंडा इथल्या आठवडी बाजारात पाणी शिरल्यानं संपूर्ण बाजार जलमय झाला होता. तसंच अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. यंदाच्या हंगामातील पहिलाच पाऊस असल्यानं शेतकरी सुखावला आहे. हवामान विभागानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे....

July 17, 2024 7:49 PM

views 57

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत पावसामुळे शेतकरी सुखावला

गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत पावसाच्या दमदार हजेरीनं शेतकरी सुखावला असून पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत.   गोंदिया जिल्ह्यात आज पावसानं दमदार हजेरी लावल्यानं भातपिकाला याचा मोठा फायदा झाला आहे. पाण्याच्या पंपाची सोय उपलब्ध नसलेल्या वरथेंब शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा संपली असून, भात रोवणीला सुरुवात झाल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे.   भंडारा जिल्ह्यातही बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली आहे. तर पवनी तालुक्यात ...