October 17, 2024 10:49 AM

views 58

तामिळनाडूमध्ये आज अति मुसळधार पावसाचा अंदाज

तामिळनाडूजवळ चेन्नईपासून 320 किलोमीटर वर समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्याचा परिणाम म्हणून तामिळनाडूमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.   चेन्नई, कांचीपुरम, तिरूवल्लुर आणि चेंगलापेट जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडू प्रशासन संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तटरक्षक दल तसंच राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

October 2, 2024 10:41 AM

views 75

येत्या दोन दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागानं येत्या दोन दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर तमिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटकचा किनारपट्टीलगतचा भाग आणि कराईकलमध्येही 5 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर येत्या 2 ते 3 दिवसांत राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागांतून नैऋत्य मान्सून माघारीसाठी हवामान अनुकूल हो...