March 20, 2025 2:32 PM

views 73

२०२४ हे आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष राहिल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या हवामानविषयक संस्थेचा अहवाल

२०२४ हे आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष राहिल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शास्त्र संघटनेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. या वर्षात जागतिक तापमान १८५० ते १९०० या वर्षांमध्ये निर्धारित करण्यात आलेल्या आधार रेषेपेक्षा प्रथमच दीड अंश सेल्सिअसने  अधिक नोंदवलं गेल्याचं यात म्हटलं आहे. २०२४ या वर्षात जगभरात नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वात जास्त लोक विस्थापित झाले असून, सौदी अरेबियासह अनेक ठिकाणी उष्णतेची अभूतपूर्व लाट उसळल्याचं अहवालात म्हटलं आहे. हवामान बदलाचे हे संकेत पृथ्वी ग्रहाची जोखीम वाढवत असल्याच...

March 13, 2025 3:46 PM

views 54

राज्यात उन्हाचा कडाका वाढणार !

राज्यातल्या अनेक भागात उन्हाचा कडाका वाढला असून, येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास राहील असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे.

January 2, 2025 9:43 AM

views 59

देशात 123 वर्षांनंतर 2024 हे ठरल सर्वात उष्णतेच वर्ष

देशात 1901 सालानंतर 123 वर्षांनंतर 2024 हे वर्ष सर्वात उष्णतेच वर्ष ठरल असल्याची माहिती काल भारतीय हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली. तसच जानेवारी महिन्यात देशातील उत्तर पश्चिम आणि मध्य पश्चिम भाग वगळता इतर सर्व ठिकाणी किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. देशाचा उत्तर पश्चिम आणि मध्य पश्चिम राज्यात थंडीची लाट कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

June 17, 2024 8:21 PM

views 60

भारताच्या काही भागात पुढील २ दिवस उष्णतेची लाट

उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. वायव्य भारताकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट हळूहळू कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू-काश्मीर, उत्तर मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेशचा किनारी भाग, राजस्थान, विदर्भ आणि पश्चिम बंगालच्या विविध भागांत उष्णेतेची तीव्र लाटेची शक्यता आहे.   दरम्यान, आगामी तीन दिवस पश्चिम बंगालचा काही भाग, आसाम, मेघालयात मुसळधार पावसाची शक्यता...