November 23, 2025 11:06 AM

views 34

हज यात्रेशी संबंधित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना

हज यात्रेशी संबंधित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्याक सचिव चंद्र शेखर कुमार यांनी भारतीय हज समितीला दिल्या आहेत.   मुंबईत झालेल्या हज परिषदेत ते बोलत होते. हज यात्रेकरूंच्या थकीत रकमेपैकी ७५ टक्के त्वरित आणि उर्वरित २५ टक्के निर्धारित पडताळणी पूर्ण केल्यावर देण्याचे आदेश त्यांनी दिले. गेल्या आठवड्यात मृत्युमुखी पडलेल्या हज यात्रेकरूंना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.

April 12, 2025 2:42 PM

views 37

डॉक्टर चंद्रशेखर कुमार यांनी हज यात्रेच्या तयारीची केली पाहणी

अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉक्टर चंद्रशेखर कुमार यांनी आज सौदी अरेबियात जाऊन हज यात्रेच्या तयारीची पाहणी केली. हज यात्रेसाठी राहण्याची उत्तम सोय आणि स्वच्छतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.   हज यात्रेसाठी भाविकांनी सुविधा पुरवण्यात सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही असं अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयानं समाजमाध्यमाद्वारे म्हटलं आहे.

January 11, 2025 8:47 PM

views 38

हज यात्रेसाठी 3676 अर्जदारांना तात्पुरत्या स्वरुपात परवानगी

हज यात्रा २०२५ साठी विविध राज्यांतल्या तीन हजार सहाशे ७६ अर्जदारांना तात्पुरत्या स्वरुपात परवानगी दिली आहे. भारतीय हज समितीनं आज या वर्षीच्या हजसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर केली. या अर्जदारांनी या महिन्याच्या २३ तारखेपूर्वी दोन लाख ७२ हजार ३०० रुपये जमा करणे आवश्यक आहे, अशी सुचना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं केली आहे. तसंच अर्जदारांना यासंदर्भात आवश्यक कागदपत्रं सादर करायला सांगितलं आहे. या वर्षी भारतीय हज समिती द्वारे एक लाख बावीस हजार यात्रेकरूंना पाठवलं जाणार आहे.

November 9, 2024 8:00 PM

views 31

हज यात्रा सुखकर आणि सुलभ व्हावी या दृष्टीनं केंद्र सरकारनं अनेक धोरणांची केली अंमलबजावणी

हज यात्रा अधिक सुखकर आणि सुलभ व्हावी या दृष्टीनं केंद्र सरकारनं अनेक धोरणांची अंमलबजावणी केली आहे. यात्रेकरूंच्या सोईसाठी डिजिटल पायाभूत सेवा सुरू केल्यानं अधिक जणांना त्याचा लाभ मिळत आहे. विशेषतः अधिकाधिक महिला यात्रेकरूंना स्वतंत्रपणे यात्रा करणं शक्य झाल्यानं महिला समानतेला चालना मिळत आहे. याशिवाय अल्प उत्पन्न गटातल्या यात्रेकरूंसाठी देखील विशेष तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी हजला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय यात्रेकरूंचा कोटा एक लाख ७५ हजार इतका असून याविषयी जानेवारी महिन्यात एका करारावर स्वाक्षरी...