April 11, 2025 10:30 AM

views 44

दृकश्राव्य परिषदेतील XR क्रिएटर हॅकेथॉनमध्ये 5 संघांना विजेतेपद

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं वेव्जलॅप्स यांच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या दृकश्राव्य परिषदेतील XR क्रिएटर हॅकेथॉनमध्ये पाच संघांना विजेतेपद देण्यात आलं. विविध शहरं आणि संस्थांमधील विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजक या हॅकेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पाच विविध श्रेणींमध्ये ही स्पर्धा झाली. इमर्सिव्ह तंत्रज्ञानात देशाची भुमिका अधोरेखित करण्यासाठी या हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. आरोग्यसेवा-तंदुरुस्ती आणि कल्याण, शैक्षणिक परिवर्तन, पर्यटनातील नवीन संधी, डिजिटल मीडिया आणि मनोरंजन आणि किरकोळ बा...

February 25, 2025 3:07 PM

views 50

विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी ‘इनेव्हेट विथ गो आयस्टॅट्स’ हॅकेथॉनचं आयोजन

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आकडेवारीवर आधारित विदा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीनं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय ‘इनेव्हेट विथ गो आयस्टॅट्स’ ही हॅकेथॉन आयोजित करत आहे. मायगोव्ह मंचावर ही स्पर्धा होणार असून त्यात सहभागासाठी आजपासून येत्या ३१ मार्चपर्यंत नोंदणी करता येईल. पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे विद्यार्थी भाग घेऊ शकतील. सर्वोत्कृष्ट ३० स्पर्धकांना रोख पारितोषिकं देण्यात येतील. पहिलं पारितोषिक दोन लाख रुपयांचं असून दुसऱ्या क्रमांकाची दोन पारितोषिकं प्रत...

July 6, 2024 9:46 AM

views 32

5G, 6G आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित हॅकाथॉन स्पर्धेचं सप्टेंबरमध्ये आयोजन

भारत WTSA24 अर्थात जागतिक दूरसंचार प्रमाणीकरण संघटनेसोबत यंदा सप्टेंबरमध्ये 5G, 6G आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित हॅकाथॉन स्पर्धेचं आयोजन करणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नवोन्मेषक, आघाडीचे उद्योजक आणि शिक्षणतज्ञांना एकत्र आणून भविष्यातील दूरसंचार तंत्रज्ञानाचा शोध घेणं आहे. हॅकाथॉन दूरसंचार क्षेत्रातील अत्याधुनिक नवकल्पना केंद्र म्हणून काम करेल.   या उपक्रमात 5G आणि 6G सारख्या प्रगत तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केलं असून यात सहभागी होणार्‍या उद्योग, शैक्षणिक आणि स्टार्टअप क्षेत्रातील संस्...