December 28, 2025 1:56 PM

views 43

Guatemala : प्रवासी बस दरीत कोसळून १५ जणांचा मृत्यू, १९ जखमी

ग्वाटेमालामधे, प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. मृतांमधे तीन महिला आणि एक अल्पवयीनाचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ग्वाटेमालामधल्या अग्निशमन दलाच्या प्रवक्त्याने दिली. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.