January 1, 2026 10:37 AM

views 89

एक फेब्रुवारीपासून तंबाखूच्या उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू होईल

नववर्षात एक फेब्रुवारीपासून तंबाखूच्या उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि पान मसाल्यावर नवीन उपकर आकारला जाणार आहे. हे कर वस्तू आणि सेवा करा व्यतिरिक्तचे कर असतील. पान मसाला, सिगारेट, तंबाखू आणि तत्सम उत्पादनांवर 40 टक्के जीएसटी दर लागू होईल, तर बिडीवर 18 टक्के वस्तू आणि सेवा कर लागेल. याव्यतिरिक्त, पान मसाल्यावर आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर आकारला जाईल, तर तंबाखू आणि संबंधित उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले जाईल.

October 4, 2025 1:42 PM

views 95

मालवाहतूक व्यावसायिक वाहनांवरचा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत.  यानुसार ट्रक, डिलिव्हरी व्हॅन यासारख्या मालवाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवरचा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे.   लघु आणि मध्यम मालवाहतूकदारांना सुलभपणे मालवाहतूक करता यावी या उद्देशानं केलेल्या या कर कपातीमुळे देशातल्या दळणवळण क्षेत्राचं पुनरुज्जीवन होऊ शकेल. जीएसटी कमी झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या प्रति टन वाहतुकीचा दर कमी होऊन पुरवठा साखळीवर अनुकूल परिणाम होईल, तसंच निर्यातीतली स्पर्धा वाढेल. 

September 28, 2025 8:05 PM

views 94

बालसंगोपनासाठी लागणाऱ्या वस्तुंवरचं जीएसटी कमी करण्याचं केंद्र सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात बालसंगोपनासाठीच्या वस्तूंबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी आज जाणून घेऊया...   व्हॉईस कास्ट  (बालसंगोपनासाठी लागणाऱ्या विविध वस्तुंवरचा जीएसटी कमी करून केंद्र सरकारने सामान्य माणसावरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. बाळांसाठी लागणाऱ्या दुधाच्या बाटल्या, डायपर्स अशा आवश्यक वस्तुंवरचा कर १२ टक्क्यांवरून ५ टक्के केला आहे. त्यासोबतच बालआरोग्य आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी उच्च तापमानावरचं दूध पूर्णपण...

September 28, 2025 7:26 PM

views 87

वस्तू आणि सेवा करपुनर्रचनेमुळे प्रक्रीयाकृत अन्नपदार्थांवर परिणाम

वस्तू आणि सेवा करपुनर्रचनेमुळे प्रक्रीयाकृत अन्नपदार्थांवर झालेल्या परिणामाबद्दलची माहिती आज ऐकूया...... होल्ड- व्हॉईस कास्ट (मखाण्यापासून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवरचा कर १२ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय फळांचे रस, मुरांबे आणि लोणच्यांवरचा तसंच फरसाण आणि सॉसेस वरचा करही १२ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर आला आहे. बिस्किटांवरचा कर १८ टक्क्यांवरुन ५ टक्के झाला आहे. यामुळे हे खाद्यपदार्थ अधिक परवडण्याजोगे झाले असून ग्राहक आणि उत्पादक दोघांनाही फायदा होईल.)

September 21, 2025 7:28 PM

views 102

वस्तू आणि सेवा कराच्या नवीन दरांची उद्यापासून अंमलबजावणी

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर रचनेत सुधारणा करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय उद्यापासून लागू होणार  आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रातल्या उत्पादनांच्या किमतीवर तसंच ग्राहकांवर याचा सकारात्मक परिणाम  होणार आहे.  जीएसटी पुनर्रचनेचा ऑटोमोबाईल क्षेत्रावर होणारा परिणाम जाणून घेऊया...   नवरात्र किंवा विजयादशमीनिमित्त नवीन वाहन खरेदी करु इच्छिणाऱ्यांना जीएसटी कररचनेतल्या बदलाचा फायदा होणार आहे. नव्या कररचनेनुसार ऑटोमोबाईल क्षेत्रातले जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. दुचाकी आणि लहान कारवरील जीएसटी २८ टक्क्यावर...

September 20, 2025 11:30 AM

views 116

कमी झालेल्या जीएसटीचा लाभ थेट शेतकऱ्यांना द्या – कृषी मंत्र्यांचे निर्देश

ट्रॅक्टर आणि शेतीसाठीच्या इतर साधनांवरच्या कमी केलेल्या जीएसटीचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे अशा सूचना केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिल्या.   शेतीच्या अवजारांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत काल नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. दरकपातीचा फायदा मध्यस्थांच्या खिशात न जाता थेट शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि याचा प्रभाव येत्या 22 तारखेपासूनच दिसायला हवा असं चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं

September 19, 2025 7:40 PM

views 107

जीएसटी दर कपातीमुळे वाहने स्वस्त होणार

जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. यामुळं अनेक वाहने स्वस्त होणार आहेत. दुचाकी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भागांवर लागणारा जीएसटी सरकारनं २८ टक्क्यांवरून १८ टक्के इतका केला आहे. तसंच, १० प्रवासी क्षमता असलेल्या बसवरचा जीएसटीही २८ वरून १८ टक्के करण्यात आला आहे. अठराशे सीसीची क्षमता असलेल्या ट्रॅक्टरवरही आता ५ टक्के जीएसटी लागणार असून यामुळे देशांतर्गत मागणी आणि निर्यातीला प्रोत्साहन मिळेल, असा अंदाज आहे. 

September 17, 2025 8:19 PM

views 140

नवीकरणीय ऊर्जेसाठी लागणाऱ्या विविध घटकांवरचा GST ५ टक्के

जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. त्यात नवीकरणीय ऊर्जेसाठी लागणाऱ्या विविध घटकांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के झाला आहे. या सुधारणांमुळे छतांवर लावण्यात येणारी सौरयंत्रणा, सौरपंप आणि तत्सम इतर उपकरणांची किंमतही कमी होईल, ज्यामुळे शेतकरी, उद्योग आणि विकासकांना फायदा होऊन देशाच्या हरित ऊर्जा परिवर्तनाला चालना मिळेल. नवीन जीएसटी दर येत्या २२ तारखेपासून लागू होणार आहेत.

September 17, 2025 2:37 PM

views 123

कलाकुसरीच्या वस्तूंवरच्या जीएसटीतही घट

जीएसटी प्रणालीत सुधारणा करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केली होती. त्यानुसार, जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. आज जाणून घेऊया, अशा काही वस्तूंबद्दल, ज्यांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आला आहे.   नव्या कररचनेत, लाकूड, दगड किंवा धातूंपासून घडवलेल्या मूर्तींवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के इतका करण्यात आला आहे. काचेच्या मूर्ती, तसंच लोखंड, ॲल्युमिनियम, पितळ आणि तांब्यापासून तयार केलेल्या कला...

September 15, 2025 2:58 PM

views 148

GST: अनेक क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवा करात सुधारणा

वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकतंच अनेक क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवा करात सुधारणा केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून अनेक व्यवसायाच्या वाढीसाठीही मदत होणार आहे.  नव्या कररचनेनुसार बांधकाम साहित्यावरल्या जीएसटीतही सुधारणा झाली आहे. यामुळे बांधकाम व्यवसाय आणि ग्राहक या दोघांनाही फायदा होणार आहे.   नव्या कररचनेनुसार सिमेंटवरील जीएसटी दर २८ टक्क्यावरून १८ टक्के, वाळू-चुना- विटा यावरील जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्के तसंच संगमरवर आणि ग्रॅनाईट ब्लॉक्सवरील जीएसटीही १२ टक्क्याव...