September 28, 2025 1:11 PM
100
GST Reforms: इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात बदल
वस्तू आणि सेवा कररचनेतले बदल गेल्या सोमवारपासून लागू झाले आहेत, हा बचत उत्सव असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं. या करसुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांवरचा अप्रत्यक्ष करांचा बोजा कमी होणार आहे. ऐकूया इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या बदलांच्या परिणामाबद्दल.... नव्या कररचनेनुसार एअर कंडीशनर, डिशवॉशर तसंच एलसीडी आणि एलईडी दूरचित्रवाणी संचावरील जीएसटी २८ टक्क्यावरून १८ टक्के झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना या वस्तू परडवण्याजोग्या दरात उपलब्ध होणार ...