July 31, 2024 7:00 PM

views 78

विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे राजस्थानचे नवे राज्यपाल

महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज राजस्थानच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. मुख्य न्यायाधीश न्यायमुर्ती  मणिंद्र मोहन श्रीवास्तव यांनी बागडे यांना राजभवन इथं राज्यपालपदाची शपथ दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेलं नियुक्तीच्या आदेशाचं पत्र मुख्य सचिव सुधांश पंत यांनी वाचून दाखवलं. राज्यपालपदाची शपथ घेतल्यानंतर हरिभाऊ बागडे यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा, विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी, उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि प्रेमचंद ब...