December 17, 2024 8:44 AM

views 48

जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र असल्याचा सल्ला राज्यपाल आणि कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी काल नागपुरात विद्यार्थ्यांना दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११२व्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल बोलत होते. या समारंभात एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रदान करण्यात आल्या. तर २२१ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.

December 10, 2024 8:11 PM

views 37

प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचं रक्षण झालं तरच आपली लोकशाही बळकट होते – राज्यपाल

प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचं रक्षण झालं तरच आपली लोकशाही बळकट होते, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केल आहे. आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिनानिमित्त राज भवनातल्या दरबार हॉल इथं महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांमध्ये मानवी हक्कांच्या शिक्षणाचा समावेश करून युवांमध्ये सहानुभूती आणि न्यायाची जाणीव निर्माण करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.  मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती न...

December 10, 2024 9:41 AM

views 39

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

गेल्या आर्थिक वर्षामध्ये थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम स्थानी होता, असं महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. राज्य विधान मंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये राज्यपालांनी काल विधीमंडळाच्या संयुक्त सभागृहाला संबोधित केलं. सध्याच्या 2024-25 या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतही 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणुक महाराष्ट्रात झाली आहे. ही गुंतवणूक, गेल्या वर्षाच्या थेट परकीय गुंतवणुकीच्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचं राज्यपाल म्हणाले. राज्य...

November 30, 2024 3:33 PM

views 56

अभिनेते अशोक सराफ यांना बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार प्रदान

मुंबईत विले पार्ले इथं काल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर, शंकर महादेवन, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आणि सयाजी शिंदे यांना देखील राज्यपालांच्या हस्ते नटसम्राट बालगंधर्व पुरस्कारानं गौरवण्यात आलं.  

October 29, 2024 1:16 PM

views 36

वस्त्रोद्योग क्षेत्रात बदल केल्यास हे क्षेत्र आघाडीवर राहील – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

कृषी क्षेत्रानंतर वस्त्रोद्योग हे सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारं क्षेत्र असून वस्त्रोद्योग क्षेत्रात आधुनिकीकरण आणि कालानुरुप बदल केले तर भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्र आघाडीवर राहील, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉटन टेक्सटाइल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल या संस्थेचा ७०वा वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळा काल मुंबईत झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते वस्त्ररत्न, वस्त्रभूषण, वस्त्र शिरोमणी पुरस्कार प्रदान करण्...

October 24, 2024 8:08 PM

views 56

जपान-भारत देशांचे संबंध सर्वोच्च पातळीवर – जपानेचे वाणिज्यदूत यागी कोजी

जपान आणि भारत एकमेकांचे स्वाभाविक भागीदार असून दोन्ही देशांचे संबंध आज सर्वोच्च पातळीवर असल्याचं जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी यांनी म्हटलं आहे. मुंबईत राजभवनात आज त्यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.  जपानचे महाराष्ट्राशी विशेष चांगले संबंध असून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासोबत कौशल्य प्रशिक्षणासाठी  जपान सहकार्य करीत आहे असंही त्यांनी सांगितलं.    जपानमधले मशरूम आणि आंब्यांचा दर्जा अतिशय चांगला असून महाराष्ट्रातल्या महिला बचत गटांना तशा प्रकारच्या उत्पादनात जप...

October 11, 2024 7:44 PM

views 42

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा यवतमाळ इथं जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यवतमाळ इथं जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कृषी, उद्योग, व्यापार, आरोग्य, पायाभूत सुविधा, राजकारण या क्षेत्रातील मान्यवरांशीही राज्यपालांनी चर्चा करत त्या क्षेत्रातील समस्याही जाणून घेतल्या. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

October 7, 2024 7:01 PM

views 41

केंद्र सरकार आदिवासी जनतेच्या विकासासाठी वचनबद्ध – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

केंद्र सरकार आदिवासी जनतेच्या विकासासाठी वचनबद्ध आहे, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले. पालघर जिल्ह्यातल्या जव्हार पेसा ग्रामसभा महासंमेलन झालं, त्यावेळी ते बोलत होते. नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना होईल, त्यात अभियांत्रिकी महाविद्यालयही असेल असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. यात जास्तीत जास्त जागा आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील असं ते म्हणाले.

September 22, 2024 6:52 PM

views 45

राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा कर्करुग्ण बालकांशी संवाद

राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवनात कर्करुग्ण बालकांशी संवाद साधला. राज्यपालांनी या मुलांना फुलं आणि भेटवस्तू दिल्या. यावेळी मुलांना राजभवनही दाखवण्यात आलं.  कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. 

September 21, 2024 7:55 PM

views 44

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट

राज्यातली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान आदी मागण्या घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा शिष्टमंडळात समावेश होता. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात केलेलं चिथावणीखोर वक्तव्य, मालवणमधला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं या मुद्दांकडे काँग्रेस नेत्यांनी रा...