November 27, 2024 4:31 PM

views 17

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भंडारा जिल्ह्यातल्या पाच गोशाळांवर गुन्हा दाखल

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भंडारा जिल्ह्यातल्या पाच गोशाळांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी जमा केलेली गुरे न्यायालयाचा आदेश मिळालेला नसतानाही गोशाळांच्या पदाधिकाऱ्यांनी बनावट हमीपत्र करुन विकली. या प्रकरणात ३ कोटी ८० लाख ५५ हजार रुपयांची विक्री झाली. लाखनी पोलिसांनी पाचही गोशाळांच्या एकूण ३३ जणांवर शासकीय मालाची अफरातफरीचा गुन्हा नोंदवला आहे.