April 6, 2025 7:04 PM

views 63

मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाकडून १२०० ग्रॅम सोनं जप्त

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी एका प्रवाशाकडून १ कोटी २ लाख रूपये किंमतीचं १२०० ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. जेदाह इथून इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून आलेल्या या प्रवाशाच्या बँगेची तपासणी केली असता  त्यातून आणलेल्या दोन इलेक्ट्रिक इस्त्र्यांमध्ये २४ कॅरट सोन्याचे १६ तुकडे लपवल्याचं आढळून आलं. सदर  प्रवाशाला सीमाशुल्क कायदा १९६२ अंतर्गत ताब्यात घेण्यात आलं आहे.

February 15, 2025 8:33 PM

views 72

मुंबई विमानतळावर सुमारे सव्वा सात किलो सोनं जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचं सुमारे सव्वा सात किलो सोनं काल रात्री जप्त केलं. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत  सुमारे साडेसहा कोटी रुपये इतकी आहे. दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांना याप्रकरणी अटक केली आहे. 

November 11, 2024 3:32 PM

views 73

दहिसर पश्चिम इथं दीड किलोपेक्षा जास्त वजनाचं सोनं जप्त

निवडणूक आयोगाच्या निगराणी पथकाने दहिसर पश्चिम इथं जवळपास दीड किलोपेक्षा जास्त वजनाचं सोनं जप्त केलं आहे. याची किंमत एक कोटी ४३ लाख इतकी आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेहिशेबी पैसे आणि संपत्तीची देवाणघेवाण रोखण्याच्या उद्देशाने ही कारवाई केली जात आहे.

November 8, 2024 3:26 PM

views 54

मुंबईच्या वडाळा इथून १ कोटी ११ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे चेंडू जप्त

मुंबईच्या वडाळा इथून पोलिसांनी काल एक कोटी ११ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे चेंडू जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी एका इलेक्ट्रिशियनला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा परिसरात एका व्यक्तीच्या हालचाली संशायस्पद वाटल्यानं त्याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे सुमारे दीड किलो वजनाचे सोन्याची पावडर असलेले चेंडू सापडले. याची किंमत एक कोटी ११ लाख रुपये इतकी आहे. हे चेंडू त्याला डोंगरीतील एका व्यक्तीनं अंधेरीत राहणाऱ्या एका व्यक्तीकडे पो...

September 14, 2024 6:29 PM

views 91

मुंबई विमानतळावर गेल्या २ दिवसात साडेसात किलो सोनं जप्त

मुंबई विमानतळावरुन गेल्या दोन दिवसात तस्करी करुन आणलेलं साडेसात किलो सोनं जप्त करण्यात आलं असून त्याची बाजारातली किंमत ५ कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती विमानतळ झोन ३ च्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोने तस्करीच्या एकूण ७ प्रकरणांमध्ये ही जप्ती करण्यात आली असून या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये विमानतळ प्राधिकरणाच्या काही कंत्राटी कामगारांचाही समावेश आहे. सोने तस्करी प्रकरणी ६ कंत्राटी कामगारांबरोबर दुबई आणि मादागास्करहून आलेल्या प्रवाशांचा समावेश आहे.