August 6, 2026 7:28 PM

views 16

कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन १० पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळंने आज 'गोबरधन' या राष्ट्रीय 'सर्क्युलर बायोएनर्जी' अर्थात चक्रीय जैव-ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. त्यासाठी २३ हजार ७३१ कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली.  'कॉम्प्रेस्ड बायोगॅस'ला भारताच्या भविष्यातल्या ऊर्जा मिश्रणाचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून स्थापित करण्यासाठी ही योजना २०२६-२७ ते २०३५-३६ या कालावधीत राबवली जाईल.