September 19, 2025 8:22 PM

views 96

गगनयान मोहिमेच्या अंतर्गत इस्रो वर्षअखेर यंत्रमानव अंतराळात पाठवणार

गगनयान मोहिमेअंतर्गत पहिली मानवरहित मोहीम याच वर्षी डिसेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी आज बेंगळुरूत दिली. मोहिमेच्या या टप्प्यात अंतराळयानाच्या तपासणीसाठी यात यंत्रमानवाला पाठवलं जाईल. अशा आणखी दोन मोहिमा होतील, त्यानंतर २०२७ च्या सुरुवातीला मानवाला घेऊन गगनयान अवकाशात झेपावेल, असंही नारायणन यांनी नमूद केलं. गगनयान मोहिमेसाठीचं ८० ते ८५ टक्के काम पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय, भविष्यात मानवाला चंद्रावर घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या रॉकेटवरही इस्...