March 30, 2025 8:24 PM

views 32

सीरियात नव्या हंगामी सरकारची शपथ

सीरियात असद कुटुंबाला सत्तेवरून हटवल्यानंतर जवळपास चार महिन्यांनी काल नव्या हंगामी सरकारनं शपथ घेतली. या सरकारमध्ये काळजीवाहू अधिकाऱ्यांच्या जागी जवळच्या सहकाऱ्यांचा समावेश करायची घोषणा सिरीयाचे अंतरिम अध्यक्ष अहमद अल-शरा यांनी केली आहे. सीरियातील ख्रिश्चन अल्पसंख्याक आणि असद यांच्या दीर्घकाळापासून विरोधक असलेल्या ज्येष्ठ नेत्या हिंद कबावत यांची सामाजिक व्यवहार आणि कामगार मंत्री म्हणून नियुक्ती केली गेली आहे. शरा यांनी नेमलेल्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलेल्या त्या पहिल्या महिला आहेत.

December 9, 2024 9:17 AM

views 37

सीरीयावर बंडखोरांचा ताबा, माजी राष्ट्राध्यक्ष असद यांनी घेतला मॉस्कोत आश्रय

सीरियामध्ये बंडखोरांनी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्यानंतर, माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद आणि त्यांच्या कुटुंबियांनी रशियात मॉस्कोमध्ये आश्रय घेतल्याच्या बातम्यांची क्रेमलिननं पुष्टी केली आहे. मानवताधारित दृष्टीकोनानं रशियानं असद यांना प्रवेशाची परवानगी दिली आहे. रशियाच्या युक्रेनवरील लष्करी हल्ल्याला असद यांनी पाठिंबा दर्शवला होता. दरम्यान, अबू- मोहम्मद अल जोलानी यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरांनी अनेक वर्षांची असद यांची सत्ता उलथवून लावत संपूर्ण इस्लामिक राष्ट्रासाठी विजयाची घोषणा केली आहे. तर स...