December 30, 2024 2:51 PM

views 49

संतोष चषक फुटबॉल स्पर्धेत पश्चिम बंगालची अंतिम फेरीत धडक

हैद्राबाद इथं सुरु असलेल्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेत काल पश्चिम बंगालनं मागील उपविजेत्या सैन्यदल संघाचा ४-२ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. हैद्राबादच्या जीएमसी बालयोगी स्टेडियमवर काल रात्री हा सामना खेळवला गेला. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात केरळनं मणिपूरचा ५ विरुद्ध १ गोलनं पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. संतोष चषक  अंतिम सामना उद्या संध्याकाळी साडेसात वाजता हैद्राबाद इथं केरळ आणि पश्चिम बंगाल या दोन संघांमध्ये होणार आहे.   पश्चिम बंगालचा संघ ४७ व्या वेळा  संतोष ट्रॉफीच्या अंत...

October 17, 2024 8:34 PM

views 37

सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारताची पाकिस्तानवर मात

नेपाळमधे काठमांडू इथं सुरु झालेल्या सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं आज पाकिस्तानवर ५-२ नं मात करत, विजयी सलामी दिली. ‘अ’ गटात भारताचा दुसरा सामना येत्या २३ तारखेला बांगलादेशाबरोबर होईल. स्पर्धेतला अंतिम सामना येत्या ३० तारखेला होणार आहे.

September 29, 2024 5:10 PM

views 152

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी १५ जूनपासून सुरू होणार

फीफा विश्वचषक फूटबॉल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. पुढच्या वर्षी म्हणजे १५जून २०२५ रोजी स्पर्धेचं उद्घाटन होणार असून एकूण १२ ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. फीफाचे अध्यक्ष गियान्नी इन्फॅन्टिनो यांनी काल सांगितलं की अमेरिकेत न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडीयमवर १३ जुलै २०२५ रोजी अंतिम सामना होईल. ग्लोबल सिटिझन बरोबर  फीफा गरिबी निर्मूलन कार्यक्रमात भागीदार असेल असंही त्यानी जाहीर केलं.