October 15, 2024 8:30 PM

views 50

अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंचाची भूमिका महत्वपूर्ण – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

भारतातले उद्योग आणि गुंतवणूक वाढीला चालना देण्यात अमेरिका - भारत धोरणात्मक भागीदारी मंचाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. या मंचाच्या सदस्यांनी अध्यक्ष जॉन टी चेंबर यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्लीत अर्थमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या भेटीत सीतारामन यांनी भारताचा वेगवान आर्थिक विकास, युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका, तसंच विमा, गृहनिर्माण, नवीकरणीय उर्जा या क्षेत्रात गुंतवणूकीच्या वाढत्या संधीबाबत माहिती दिली.

September 24, 2024 1:55 PM

views 55

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून ५ दिवसांच्या उझ्बेकिस्तान दौऱ्यावर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून ५ दिवसांच्या उझ्बेकिस्तान च्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यामध्ये उद्या त्या एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेच्या ९ व्या वार्षिक सभेला  उपस्थित राहणार आहेत. भारत आणि उझ्बेकिस्तान दरम्यान होणाऱ्या द्विपक्षीय गुंतवणूक करारावर त्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या होतील. 

September 12, 2024 8:19 PM

views 61

महिला सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

महिला सक्षमीकरणासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असून त्यामुळे महिलांना स्वाभिमानानं जगणं शक्य होईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. तमिळनाडूत कोईमतूर इथं एका कल्याणकारी योजनेअंतर्गत गरजू महिलांना शिवण यंत्रांचं वाटप केल्यानंतर त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ दोन लाखाहून जास्त  महिलांनी घेतला असल्याचं त्या म्हणाल्या.   

August 8, 2024 6:52 PM

views 50

कोविडनंतर सरकार भांडवली खर्चात सर्वाधिक वाढ – अर्थमंत्री निर्मला सीतारमण

कोविडनंतर सरकार भांडवली खर्चात जास्तीत जास्त वाढ करत असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. राज्यसभेत वित्त विधेयक, विनियोजन विधेयक आणि जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयकावरल्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. २०२३-२४ या आर्थिक प्रभावी भांडवली खर्च १५ लाख कोटीपेक्षा जास्त किंवा १८ टक्के असू शकतो, असं सीतारमण म्हणाल्या.    त्याआधी या विधेयकांवरल्या चर्चेची सुरुवात करताना काँग्रेसचे खासदार विवेक तनखा यांनी महिलांसाठी देशात विशेष कर आकारणीचे विशेष टप्पे नसल्याकडे ...