January 3, 2025 9:57 AM

views 59

येत्या 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान रंगणार 23 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा 13 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात होणार आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी काल पुण्यात पत्रकार परिषेदत याबाबत घोषणा केली. या महोत्सवात मराठी चित्रपटांबरोबरच दीडशेहून अधिक देशी-परदेशी चित्रपट प्रेक्षकांना बघता येतील. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांची जन्मशताब्दी ही या वर्षीच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात 107 देशातल्या 14 चित्रपटांची निवड अंतिम फेरीस...

January 2, 2025 2:27 PM

views 62

२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचं आयोजन १० ते १६ जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाण्यात होणार

२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचं आयोजन १० ते १६ जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाण्यात होणार आहे. कान चित्रपट महोत्सवात अ-सर्टन विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डाॅग’ या चायनीज चित्रपटानं या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. महोत्सवात आशियाई विभागात चीन, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, कझाकिस्तान, ट्युनिशिया, जपान, इराण, दक्षिण कोरिया आणि श्रीलंका या देशातल्या चित्रपटांचा समावेश आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमधल्या अकरा चित्रपटांचा समावेश आहे...

November 7, 2024 3:45 PM

views 48

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २०८ चित्रपट प्रदर्शित होणार

येत्या २० नोव्हेम्बरला गोव्यामध्ये सुरु होत असलेल्या ५५ व्या इफ्फी, म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित फिल्म बझार मध्ये वैविध्याने समृद्ध असलेले २०८ चित्रपट प्रदर्शित केले जातील. यावेळी पूर्ण झालेले अथवा निर्मिती नंतरच्या टप्प्यातले चित्रपट प्रदर्शित केले जातील.   या व्यासपीठावर चित्रपट निर्माते जागतिक चित्रपट प्रोग्रामर, वितरक, विक्री एजंट आणि गुंतवणूकदारांशी थेट जोडले जातील. फिल्म बझार मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये १४५ फीचर फिल्म्स, २३ मध्यम लांबीच्या आणि ३० श...

June 19, 2024 7:43 PM

views 77

‘मिफ’च्या स्पर्धांमधले चित्रपट सखोल, ठाम आणि संवेदनशील; परीक्षकांचं मत

१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी विद्यार्थी आणि नवोदित निर्मात्यांचे चित्रपट सखोल, ठाम आणि संवेदनशीलरीत्या विषय मांडणारे आहेत, अशा शब्दांत परीक्षक मंडळानं या निर्मात्यांचं कौतुक केलं. या दोन्ही परीक्षक मंडळांनी आज मिफच्या पाचव्या दिवशी वार्ताहरांशी संवाद साधला. राष्ट्रीय स्पर्धेत अपूर्वा बक्षी यांच्या नेतृत्वातल्या पाच जणांच्या परीक्षक मंडळानं माहितीपट, अॅनिमेशन आणि शॉर्ट फिक्शन अशा एकंदर ७७ चित्रपटांचं परीक्षण केलं. या मंडळात अॅना हेनके...

June 18, 2024 1:04 PM

views 42

‘मिफ’ महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लघुपट, माहितीपटांचे प्रदर्शन

१८व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा तिसरा दिवस अनेक चित्रपट, माहितीपट, लघुपटांच्या प्रदर्शनांनी उत्साहात पार पडला. मिफमध्ये आज प्रतिष्ठेच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गेल्या काही वर्षांत निवडल्या गेलेल्या काही निवडक चित्रपटांसोबत रशिया, इराण, इटली इत्यादी देशांचे, तसंच भारतीय लघुपट, माहितीपट आणि ऍनिमेशनपट, ऑस्करसाठी निवडलेले लघुपट दाखवले आहेत.     याअंतर्गत, २०२०मध्ये बर्लिन चित्रपट महोत्सवात दाखवलेल्या ‘गुमनाम दिन’ हा लघुपटाच्या दिग्दर्शक एकता मित्तल या...

June 17, 2024 3:53 PM

views 70

मिफ महोत्सवात ‘सामाजिक परिवर्तन करण्याची माहितीपटांची क्षमता’ या विषयावर चर्चासत्र

मुंबईत सुरु असलेल्या १८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज ‘सामाजिक परिवर्तन करण्याची माहितीपटांची क्षमता’ या विषयावर चर्चासत्र झालं. दिग्दर्शक टी. एस. नागभरण यांची मुलाखत डी. रामकृष्णन यांनी घेतली.   याशिवाय ‘माहितीपटांमधलं निर्मितीमधून महिलांचं भावविश्व’ या विषयावरही चर्चा सत्र झालं. याशिवाय विविध माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपट आज दाखवले जाणार आहेत.   

June 16, 2024 9:02 PM

views 98

१८व्या ‘मिफ’ महोत्सवाचा दुसरा दिवस उत्साहात पार

  १८व्या 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस भरगच्च कार्यक्रम आणि उपक्रमांसह पार पडला. माहितीपट क्षेत्रातल्या नवोदितांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या 'माहितीपट बझार'चं उद्घाटन 'दिल्ली क्राइम' या गाजलेल्या वेबसीरिजच्या निर्मात्या अपूर्वा बक्षी यांच्या हस्ते, महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार आणि पत्रसूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या उपस्थितीत झालं.     विविध देशांचे, भाषांचे आणि विषयांवर...

June 13, 2024 7:37 PM

views 101

१८ व्या ‘मिफ’ महोत्सवात २१ मराठी चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश

मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा २१ मराठी चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात प्रेक्षकांना या चित्रपटांचा आस्वाद घेता येईल.   आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सार्वनिक कौर यांचा अगेन्स्ट द टाइड हा चित्रपट आहे. तर राष्ट्रीय स्पर्धेत बिगारी कामगार, भैरवी, भगवान, गुंतता हृदय हे, वूमन ऑफ बिलियन, फेरा, आजोबांचं घर, वैद्यराज, अद्वैताच्या पाऊलखुणा, सहस्त्रसूर्य सावरकर, डोमकावळा - द रावन, भेड चाल, म्हातारा डोंगर हे लघुपट-माहितीपट पाहता येतील...