August 21, 2025 12:35 PM

views 42

फिजीचे प्रधानमंत्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

फिजीचे प्रधानमंत्री सितीवेनी लिगामामदा राबुका रविवारी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राबुका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. दोन्ही देशातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी राबुका यांचा दौरा महत्त्वाचा असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. 

August 6, 2024 3:42 PM

views 50

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘द कंपॅनियन ऑर्डर ऑफ फिजी’ हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या फिजीच्या दौऱ्यावर असून त्यांना आज ‘द कंपॅनियन ऑर्डर ऑफ फिजी’ हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. फिजीचे राष्ट्राध्यक्ष विलयम काटोनिवेरे यांनी त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं. फिजीच्या लष्कराकडून मुर्मू यांना ‘गार्ड ऑफ द ऑनर’ सुद्धा देण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत-फीजी संबध दृढ करण्यासंदर्भात फिजीचे राष्ट्राध्यक्ष काटोनिवेरे आणि प्रधानमंत्री सिटिव्हनी राबुका यांच्यासमवेत चर्चा केली. फिजीची राजधानी सुवा इथं आज सकाळी त्यांनी भ...