September 19, 2025 6:16 PM

views 51

दहशतवादाविरोधात लढा अधिक बळकट करण्याचं भारताचं आवाहन

सर्व स्वरूपातल्या दहशतवादाविरोधात  लढा अधिक बळकट करण्याचं आवाहन भारतानं जागतिक समुदायाला केलं आहे. परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत माध्यमप्रतिनिधींना सांगितलं की,  प्रत्येक देशानं सीमापार दहशतवादाचा निकरानं मुकाबला केला पाहिजे. ब्रिक्स, शांघाय सहकार्य संघटना आणि इतर कोणत्याही मंचावर संमत झालेल्या सर्व ठरावांमधे दहशातवादाचा कडाडून विरोध असला पाहिजे असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केलं. नेपाळमधे सुशीला कार्की यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाल्याचं भारत...