July 26, 2025 8:40 PM

views 34

FIDE Chess World Cup: कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात पहिला टप्पा ड्रॉ

फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात पहिला टप्पा ड्रॉ झाला आहे. या स्पर्धेचं जेतेपद आणि उपविजेतेपदही भारताकडे येणार आहे. त्यामुळे भारताच्या महिला बुद्धिबळाच्या वाटचालीतला हा एक ऐतिहासिक टप्पा  ठरला आहे.    या स्पर्धेत जिंकणारी बुद्धिबळपटू पुढल्या वर्षी फिडे महिला कँडिडेट्स टूर्नामेंटमध्ये जागतिक अजिंक्यपदासाठी जू वेंजून हिला आव्हान देईल.

July 20, 2025 7:59 PM

views 36

FIDE Women’s Chess World Cup : चार ग्रँडमास्टर उपांत्यपूर्व फेरीत आणणारा भारत पहिला देश

जॉर्जियामध्ये बाटुमी इथं सुरु असलेल्या फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत चार ग्रँडमास्टर उपांत्यपूर्व फेरीत आणणारा भारत पहिला देश ठरला आहे. कोनेरू हम्पी, दिव्या देशमुख, द्रोणवल्लि हरिका आणि आर वैशाली या त्या चार ग्रॅण्डमास्टर्स आहेत.  या स्पर्धेत उपांत्यफेरी गाठणारे बुद्धिबळपटू २०२६ साली होणाऱ्या विमेन्स  कॅन्डीडेट स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.