November 26, 2025 7:53 PM

views 56

उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखीर सिंदारोव्हला फिडे विश्वचषक स्पर्धेचं अजिंक्यपद

उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखीर सिंदारोव्ह यानं फिडे विश्वचषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. अवघ्या १९व्या वर्षी ही कामगिरी करणारा तो सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला आहे. गोव्यातल्या अरपोरा इथं झालेल्या या स्पर्धेत त्यानं चीनचा ग्रँडमास्टर वेई यी याला हरवलं. सिंदारोव्ह, वेई यी आणि रशियाचा आंद्रे एसिपेंको हे तिघेही पुढच्या वर्षी होणाऱ्या कँडिडेट्स टूर्नामेंटसाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेत विजयी होणारा बुद्धिबळपटू विद्यमान विश्वविजेता, ग्रँडमास्टर डी. गुकेश याला आव्हान देईल.

July 28, 2025 7:42 PM

views 66

FIDE Chess World Cup : दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती

भारताची दिव्या देशमुख हिनं फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरलं आहे. जॉर्जियाच्या बाटुमी इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिनं भारताच्याच हंपी कोनेरू हिच्यावर अटीतटीच्या टायब्रेकमध्ये एका गुणानं मात केली. या यशाबरोबरच दिव्या ही भारताची ८८वी ग्रँडमास्टर ठरली आहे. हंपी कोनेरू, हरिका द्रोणावल्ली आणि वैशाली रमेशबाबू यांच्यानंतरची ही कामगिरी करणारी ती चौथी महिला ग्रँडमास्टर आहे. विश्वचषक पटकावल्यानंतर आता ती महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या जू वेंजून हिला आव्हान देईल. मूळच्या ...

July 27, 2025 1:33 PM

views 45

FIDE Chess World Cup : कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात विजेतेपदासाठीची लढत सुरु

फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरु हंपी आणि दिव्या देशमुख या तुल्यबळ  खेळाडूंमधे विजेतेपदासाठीची लढत सुरु आहे. पहिला गेम काल बरोबरीत राहिल्यानं दोघींनाही प्रत्येकी अर्धा गुण देण्यात आला आहे.  दुसरा निर्णायक गेम आज होणार आहे.