June 27, 2025 10:07 AM

views 31

राज्यात वीजदरात टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26 टक्के कपात होणार, सुधारित दर येत्या 1 जुलैपासून लागू

राज्यात प्रथमच वीजग्राहकांना दरकपात मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. वीजदरकपात करण्यासाठी महावितरणनं केलेल्या याचिकेवर राज्य वीज नियामक आयोगानं दिलेल्या निकालानुसार, वीजदरात टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26 टक्के कपात केली जाईल. सुधारित दर येत्या 1 जुलैपासून लागू होतील. पहिल्या वर्षी 10 टक्के कपात होणार आहे. भविष्यातल्या वीज खरेदीत सौर ऊर्जा आणि हरित ऊर्जेवर भर दिल्यामुळे वीजखर्चात बचत होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.   दरमहा 10 युन...

August 21, 2024 9:53 AM

views 56

नेपाळमधून २५१ मेगावॅट वीज आयात करायला भारताची परवानगी

नेपाळमधून १२ जल विद्युत प्रकल्पामधून २५१ मेगावॅट वीज आयात करायला भारताच्या सीमापार व्यापार प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. नेपाळकडून बिहारसाठी ही वीज प्रथमच कराराच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे आता भारताकडून करण्यात येणाऱ्या वीज आयंतीत वाढ झाली असून, नेपाळमधील २८ प्रकल्पातून ९४१ मेगावॅट वीज खरेदी केली जाणार आहे. यापूर्वीच नेपाळ वीज निर्यात करणारा महत्वाचा देश बनला असून, मागील आर्थिक वर्षात नेपाळणने सुमारे १४ अब्ज डॉलर्सची वीज निर्यात केली आहे.