September 16, 2024 1:33 PM

views 34

देशात अनेक ठिकाणी ईदएमिलाद चा उत्साह

देशात अनेक ठिकाणी आज ईद - ए - मिलाद - उन - नबी म्हणजेच प्रेषित मोहम्मद पैगंबरांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला त्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाच्या भावनांना बळ देण्यासाठी प्रेरित केलं, त्यांनी समाजात दया, मानवतेचा प्रसार केला असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.   प्रेषित हजरत मोहम्मदांची मानवता आणि बंधुभावाची शिकवण निरंतर जगाला मा...

September 10, 2024 6:58 PM

views 45

ईद-ए-मिलाद दरम्यान डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

आगामी ईद-ए-मिलाद दरम्यान डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. राष्ट्रीय हरित लवादानं याआधीच गणेशोत्सवाच्या काळात डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदी घातलेली आहे, त्यामुळे न्यायालयाने या जनहित याचिकेचा विचार करावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलानं केली, मात्र, यावर बंदी हरित लवादानं घातली असेल...