January 8, 2026 1:41 PM

views 71

सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीवर EDचे छापे

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने देशभरात सरकारी नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या एका टोळीचा शोध सुरू केला असून, सहा राज्यांमधल्या १३ शहरांमध्ये जवळपास १५ ठिकाणांवर छापे टाकले. बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि उत्तर प्रदेशात हे छापे टाकण्यात आले.    ही टोळी बनावट ईमेल खात्यांचा वापर करून तसंच अधिकृत सरकारी डोमेनची हुबेहूब नक्कल करून नोकरीचं बनावट पत्र पाठवत होती. यावर विश्वास बसावा यासाठी काही जणांना सुरुवातीचे दोन ते तीन महिने पगारही देण्यात आल्याचं ईडीने म्हटलं आहे. आधी हा घोटाळा भ...

November 20, 2025 8:08 PM

views 106

उद्योजक अनिल अंबानी यांच्या मालकीच्या काही इमारती जप्त

ईडीच्या विशेष कृती दलानं उद्योजक अनिल अंबानी यांच्या मालकीच्या काही इमारती जप्त केल्या आहेत. नवी मुंबईतल्या धीरुभाई अंबानी नॉलेज सिटी आणि मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये या इमारती आहेत. याशिवाय पुणे, चेन्नई, भुवनेश्वरमधल्याही काही इमारती आणि मोकळ्या जागा ईडीनं जप्त केल्या आहेत. या सर्व मालमत्तांची एकत्रित किंमत सुमारे चौदाशे कोटी रुपये आहे. विविध बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई झाली असून आतापर्यंत त्यांचजी सुमारे ९ हजार कोटींची मालमत्ता जप्त झाली आहे.