January 4, 2025 7:35 PM

views 38

इक्वेडोरमध्ये ६० दिवसांची आणीबाणी जाहीर

इक्वेडोरमध्ये राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी, तिथे अंतर्गत अशांतता आणि सशस्त्र संघर्ष सुरु असलेल्या सात प्रांत आणि तीन नगरपालिका क्षेत्रात ६० दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे. गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण आणि संघटित सशस्त्र गटांची वाढतं प्रमाण ही आणीबाणीची लागू करण्यामागची मुख्य कारणं असल्याचं नुबा यांनी सांगितलं. यासोबतच आणखी २० ठिकाणी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली असल्याचं वृत्त तिथल्या माध्यमांनी दिलं आहे.

November 19, 2024 8:24 PM

views 25

इक्वेडोर या देशानं जंगलातले वणवे, पाणी टंचाई आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी ६० दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित

दक्षिण अमेरिकेतल्या इक्वेडोर या देशानं जंगलातले वणवे, पाणी टंचाई आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी ६० दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. या प्रांतात जंगलात सध्या  १७ विविध  ठिकाणी वणवे पेटलेले असून ५ ठिकाणी आग नियंत्रणात आली आहे, अशी माहिती  इक्वेडोरचे ऊर्जामंत्री इनेस  मांझानो यांनी दिली आहे.अझूये आणि लोजा  प्रांतांना याचा सर्वाधिक फटका बसला असून दुष्काळामुळे मोठ्या ऊर्जासंकटाचा सामना इक्वेडोरला करावा लागतोय.   मागच्या सप्टेंबर  महिन्यापासून  सरकारला नाईलाजानं  वीजकपात करावी लागत आहे.