December 26, 2025 5:36 PM

views 75

लातुरच्या निलंगा तालुुक्यात भूकंप नसल्याची नोंद

लातुरच्या निलंगा तालुक्यातल्या निटुर परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मौजे निटुर परिसरात आज दुपारी भूगर्भातून गूढ आवाज होऊन भूकंप सदृष धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली होती. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनानं नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीशी याबाबत संपर्क साधला. या संस्थेनं केलेल्या तपासणीनंतर भूकंप झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

May 12, 2025 11:40 AM

views 37

तिबेटमध्ये भूकंपाचा धक्का

भारताचा शेजारी देश तिबेटमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे पावणेतीनच्या सुमारास 5.7 रिख्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद झाली. यामध्ये आतापर्यंत जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. भारताच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार भूकंपाचे केंद्र जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होते.

April 2, 2025 10:42 AM

views 62

“ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत म्यानमा मधील भूकंपग्रस्तांना मदत

भारत सरकारतर्फे, म्यानमा मधील भूकंपग्रस्तांना “ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत मदत पुरवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय वैद्यकीय पथकानं स्थापन केलेल्या आर्मी फील्ड रुग्णालयात 104 रुग्णांवर उपचार करण्यात आले तर दोन मोठ्या शास्त्रक्रियादेखील करण्यात आल्या असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.   16 टन मानविय मदत आणि आपत्ति निवारण साहित्य घेऊन जाणारं भारतीय हवाई दलाचं एक विमान काल दुपारी 2 वाजता म्यानमामधील मंडाले विमानतळावर पोहोचलं. मदतीसाठी मंडाले इथं उतरणारं हे पहिलंच विमान होतं.

March 28, 2025 3:46 PM

views 51

म्यानमारला आज सलग दोन मोठे भूकंपाचे धक्के

म्यानमारला आज सलग दोन मोठे भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यांची तीव्रता ७ पूर्णांक ७ दशांश आणि ६ पूर्णांक ४ दशांश रिख्टर स्केल होती. या भूकंपाचं केंद्र सागाइंग इथं होतं.   या धक्क्यांमुळं अनेक इमारती कोसळल्या. थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्यानं अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. इथं कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त अद्याप हाती आलेलं नाही.   दरम्यान छत्तीसगढच्याच नारायणपूर जिल्ह्यात आज नक्षलवाद्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन बस्तर फाय...

February 25, 2025 1:44 PM

views 39

बंगालच्या उपसागरात ५.१ रिक्टर स्केलचा भूकंप

बंगालच्या उपसागरात आज सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ५.१ दशांश  रिक्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके बसले. यामुळे ओदिशातल्या भुवनेश्वर, पुरी, पारादीप, बारीपाडा, संबलपूर, अंगुल आणि बालासोर सारख्या भागांमध्ये भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. हा भूकंप समुद्राच्या पृष्ठभागाखाली ९१ किलोमीटर खोलवर झाला होता. यात कोणतीही जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान झाल्याचं वृत्त नाही.

December 6, 2024 3:20 PM

views 40

अमेरिकेत उत्तर कॅलिफोर्नियाच्या काही भागात भूकंपाचा धक्का

अमेरिकेत काल उत्तर कॅलिफोर्नियाच्या काही भागात भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७ इतकी होती. या धक्क्यानंतर त्सुनामीची चेतावणी दिल्यामुळे किनारपट्टीवरच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. हम्बोल्ट काऊंटीच्या फेरंडल शहराच्या पश्चिमेला या भूकंपाचं केंद्र होतं असं अमेरिकाच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानं सांगितलं आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.

October 22, 2024 4:48 PM

views 73

नांदेड जिल्ह्यातल्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड शहर आणि परिसरात तसंच अर्धापूर, हदगाव या तालुक्यात आज सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी  भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३ पूर्णांक ८ दशांश रिक्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून २९ किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातल्या सावरगाव या गावात असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं  आहे.