December 5, 2024 7:59 PM

views 51

भारताला फक्त इतर अर्थव्यवस्थांसाठी ग्राहक बाजारपेठ व्हायचं नाही – मंत्री डॉ. एस जयशंकर

भारताला फक्त इतर अर्थव्यवस्थांसाठी ग्राहक बाजारपेठ व्हायचं नाही असं आज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज सांगितलं.  नवी दिल्लीत भारत ॲट 100 शिखरपरिषदेत ते बोलत होते. जागतिक कंपन्या आणि उद्योग भारतात फक्त भारतीय बाजारपेठेसाठी येत नाहीत तर तिथल्या गुणवत्तेसाठीही येतात असं ते म्हणाले. सूक्ष्म, लघु आणि  मध्यम उद्योग अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालत असून त्यांना सक्षम करणं ही सरकारची जबाबदारी आहे, असं त्यांनी पुढे सांगितलं. 

September 29, 2024 2:52 PM

views 64

पाकिस्तानचं दहशतवादाचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही – मंत्री डॉ. एस जयशंकर

पाकिस्तानचं दहशतवादाचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही आणि या कृतींचे परिणाम त्या देशाला नक्कीच भोगावे लागतील, असं परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत  बोलत  होते.  पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे बळकावलेल्या भारतीय भूभागाची सुटका करणं  आणि दहशतवादाशी दीर्घकाळापासून असलेली संलग्नता सोडणं  या दोनच  मुद्यांवर भारत-पाक  दरम्यान चर्चा  होऊ  शकते,असं जयशंकर म्हणाले.