October 2, 2025 3:13 PM

views 120

देशभरात विजयादशमीचा उत्साह

आश्विन शुद्ध दशमी - विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण  आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीने शस्रपूजा करून साजरा होत आहे. नवरात्रौत्सवाचा समारोप करणारा हा सण महाराष्ट्रात शिलंगणाचं सोनं लुटून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या सणाला नवीन खरेदी केली जाते.  मात्र अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पुराचं सावट सणावर जाणवत आहे. पिकांचं आणि फूलपिकांचं नुकसान झाल्यामुळे फुलं तोरणं यांच्या प्रमाणात घट झाली आहे.    विजया दशमीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा देताना म्हटलं ...

October 1, 2025 3:04 PM

views 171

उद्या साजऱ्या होणाऱ्या  विजयादशमीच्या सणाचा उत्साह

उद्या साजऱ्या होणाऱ्या  विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या सणाचा उत्साह सर्वत्र बघायला मिळत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात या दिवशी शारदीय नवरात्रौत्सवाचं उत्थापन होऊन या दिवशी सीमोल्लंघन साजरं केलं जातं. तर उत्तरेकडच्या राज्यांमधे रावण दहनाने रामलीलेचा समारोप होतो.   राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त उद्या अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्वयंस...

October 13, 2024 12:29 PM

views 81

दसरा म्हणजेच विजयादशमीचा सण तसंच 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन राज्यभरात उत्साहात साजरा

देशभरात काल दसरा म्हणजेच विजयादशमीचा सण पारंपरिक हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किला मैदानावर दसरा सोहोळ्यात भाग घेतला. वाईटावर चांगल्याचा विजय याचं प्रतीक म्हणून रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचं यावेळी दहन करण्यात आलं. श्री धार्मिक लीला समितीनं आयोजित केलेल्या या दसरा कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दार्जिलिंग मध्ये लष्कराच्या जवानांबरोबर शस्त्रपूजा करून विजयादशमी साजरी केल...

October 12, 2024 9:41 AM

views 83

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त राज्यभरात उत्साह

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा म्हणजेच विजयादशमीच्या सणाचा आज राज्यभरात उत्साह आहे. गेले नऊ दिवस सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सांगतेचा आजचा दिवस. यानिमित्त राज्यभरातल्या देवीच्या मंदिरांमधून सीमोल्लंघनाच्या मिरवणूका काढल्या जाणार आहेत. देवीचं शक्तीपीठ असलेल्या कोल्हापुरातला शाही दसरा सर्वत्र प्रसिद्ध आहे. आज संध्याकाळी देवी अंबाबाईची पालखी निघणार असून दसरा चौकात छत्रपती घराण्यातील मान्यवरांकडून शमी पूजन केलं जाईल.   राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहोळा आज सकाळी सात ...