August 1, 2026 3:29 PM

views 61

सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारण विधेयक २०२६ ला राष्ट्रपतीची मंजुरी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारण विधेयक 2026ला मंजुरी दिली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करणे, हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे.