September 8, 2025 3:45 PM

views 53

भारताला उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवावं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन

भारताला पुन्हा एकदा उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज नवी दिल्लीत अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. अर्थव्यवस्था सक्षम आणि स्वावलंबी असण्याची, तसंच देशाच्या निर्यातीत वाढ होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.    देशाच्या विकासात लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था अस्थिर झाली तरी त्याचा देशाच्या अर्थव्यवस...

August 29, 2025 1:09 PM

views 45

स्कोप एमिनन्स पुरस्कार आज नवी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान

सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांसाठीचे स्कोप एमिनन्स पुरस्कार आज नवी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम हे आर्थिक विकास आणि सामाजिक समावेशनाचं एक शक्तिशाली साधन ठरले आहेत, असं राष्ट्रपती या पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना म्हणाल्या.   सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांनी औद्योगिकीकरण, पायाभूत सुविधा विकास, सामाजिक उन्नती आणि संतुलित प्रादेशिक विकासाचा पाया घातल्याचंही मुर्मू यावेळी म्हणाल्या.

July 15, 2025 12:37 PM

views 69

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या दौऱ्यावर असून आज त्या कटक इथं रवेनशॉ विद्यापीठाच्या 13 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत तसंच रवेनशॉ कन्याशाळेच्या तीन इमारतींच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी करणार आहेत.   15 व्या शतकातले महान ओडिया कवी आणि विचारवंत सरला दास यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होणार असून, कलिंगरत्न पुरस्कारांचं वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. हा दौरा आटोपून राष्ट्रपती संध्याकाळी दिल्लीत पोहोचतील.

July 14, 2025 10:50 AM

views 52

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात त्या भुवनेश्वर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या पाचव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील.   तसंच उद्या (मंगळवारी) रेवेनशॉ विद्यापीठाच्या 13 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती मुर्मू उपस्थित राहतील, यावेळी त्यांच्या हस्ते रेवेनशॉ गर्ल्स हायस्कूलच्या तीन इमारतींच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात येणार आहे.   याशिवाय कटक इथं आदिकबी सरला दास यांच्या जयंती समारंभाला राष्ट...

May 30, 2025 7:00 PM

views 59

राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण

राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं. या पुरस्कार सोहळ्यात, राष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीनं सेवा देणाऱ्या १५ परिचारिका आणि परिचारकांचा गौरव करण्यात आला.   त्यात जळगाव जिल्ह्यातल्या कठोरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहायक परिचारिका आणि मिडवाइफ सुजाता अशोक बागूल यांचा समावेश आहे. बागूल यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १८ वर्षांच्या ...

April 2, 2025 9:32 AM

views 36

डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात रिझर्व्ह बँकेचा मोठा वाटा

रिझर्व्ह बॅंक ही देशाच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ असून भारताला डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात रिझर्व्ह बँकेचा मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या वर्धापनदिनाचा सांगता सोहळा काल मुंबईत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडला; त्यावेळी त्या बोलत होत्या.   सामान्य नागरिकांचा भारतीय रिझर्व्ह बँकेवरचा विश्वास हेच रिझर्व्ह बँकेचं गेल्या नऊ दशकातलं सर्वात मोठं यश आहे, असं त्या म्हणाल्या. विकसित भा...

March 24, 2025 2:41 PM

views 30

लवकरच छत्तीसगड राज्य नक्षलवादातून मुक्त होईल असा राष्ट्रपतींना विश्वास

डाव्या अतिरेकीवादाने प्रभावित झालेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं असून लवकरच छत्तीसगड हे राज्य नक्षलवादातून मुक्त होईल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला. त्या आज रायपूर इथे छत्तीसगढ विधानसभेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. ९० सदस्यांच्या या विधानसभेत १९ महिला आमदार असून २०२३मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती, याचं कौतुक राष्ट्रपतींनी यावेळी केलं. 

March 22, 2025 9:44 AM

views 57

वंचित वर्गाप्रती संवेदनशीलता ही देशाची प्रतिष्ठा – राष्ट्रपती

वंचित वर्गाप्रती असलेली संवेदनशीलता ही समाजाची आणि देशाची प्रतिष्ठा ठरवते, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल राष्ट्रपती भवनात आयोजित पर्पल फेस्ट कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होत्या. करुणा,सर्वसमावेशकता आणि सलोखा ही भारतीय संस्कृतीची मूल्ये असून अपंगत्वाचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम याविषयी जनजागृती करणं आणि अपंग व्यक्तींना समाजात समजून घेणं, स्वीकारणं हा 'पर्पल फेस्ट'चा उद्देश असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या.     सामाजिक न्याय आणि अधि...

March 11, 2025 2:55 PM

views 48

पंजाबच्या केंद्रीय विद्यापीठात केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील संस्कृतींचा मिलाफ दिसून येतो- राष्ट्रपती

पंजाबच्या केंद्रीय विद्यापीठात केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील संस्कृतींचा मिलाफ दिसून येतो आणि इथल्या विद्यार्थी तसंच शिक्षकांमध्ये भारतातल्या विविधतेच प्रतिबिंब उमटलेलं दिसतं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. पंजाबातल्या बठिंडा विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभात त्या आज बोलत होत्या.   बठिंडा इथून जवळ असलेल्या तलवंडी इथल्या तखत श्री दमदमा साहिब इथे गुरु नानकांनी त्यांच्या संघर्षमय जीवनातला काही काळ घालवला होता, अशा महत्वाच्या स्थानामधील अध्यात्मिक ऊर्जा आणि वीररस इथेह...