November 18, 2025 7:32 PM

views 78

कोणत्याही स्वरुपातल्या दहशतवादाबद्दल जगाने शून्य सहनशीलता धोरण स्वीकारायला हवं-एस जयशंकर

कोणत्याही स्वरुपातल्या दहशतवादाबद्दल जगाने शून्य सहनशीलता धोरण स्वीकारायला हवं असं आग्रही प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज केलं. ते रशियात मास्को इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत बोलत होते. सध्या हवामान बदल,  महामारी आणि अतिरेक यांच स्वरुप अधिकाधिक टोकाला जात आहे आणि त्यासाठी माणसामाणसांमधील सहकार्य आवश्यक आहे असंही ते म्हणाले.

October 31, 2025 9:47 AM

views 80

जागतिक घडामोडींमध्ये धोरणात्मक अनिश्चितता आणि आर्थिक अस्थिरता वाढत असल्याची भारताकडून चिंता व्यक्त

जागतिक घडामोडींमध्ये सध्या अनिश्चित काळ असून धोरणात्मक अनिश्चितता आणि आर्थिक अस्थिरता दोन्ही वाढत असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.    जर्मन एकता दिनाच्या समारंभात बोलताना डॉक्टर जयशंकर यांनी सांगितलं की, जागतिक व्यवस्था स्थिर करण्यासाठी तसंच शांतता, प्रगती आणि समृद्धीला चालना देण्याकरिता भारत आणि जर्मनीची महत्त्वाची जबाबदारी आहे.   परस्पर सहकार्य वाढवून आणि परस्पर लाभदायक कार्यक्रम पत्रिकेद्वारे हे सर्वोत्तम प्रकारे साध्य करता येईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर...

September 26, 2025 2:43 PM

views 100

भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करार लवकर पूर्ण करण्यासाठी इटलीचा पाठिंबा

भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी इटलीचं संपूर्ण समर्थन आहे, असं प्रतिपादन इटलीचे उप प्रधानमंत्री अंटोनियो ताजनी यांनी केलं आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या सोबत ताजनी यांची बैठक झाली त्यानंतर त्यांनी हे स्पष्ट मत व्यक्त केलं. उभय देशात धोरणात्मक भागीदारी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. परस्पर देशांच्या मंत्र्यांनी भूमध्यसागरीय, मध्य पूर्व, युक्रेन आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडींवर या बैठकीत चर्चा केली, अ...

August 23, 2025 1:36 PM

views 72

भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार विषयक वाटाघाटी सुरु- डॉ. एस जयशंकर

भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार विषयक वाटाघाटी अद्याप सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका खासगी कार्यक्रमात बोलत होते. देशातले शेतकरी आणि लघु उत्पादकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

February 23, 2025 8:29 PM

views 68

भारत हा वैविध्यपूर्ण देश असून, इथं एक भारत श्रेष्ठ भारत हे तत्व दिसून येतं-परराष्ट्रमंत्री

भारत हा वैविध्यपूर्ण देश असून, इथं वेगवेगळ्या संंस्कृती असल्या तरी एक भारत श्रेष्ठ भारत हे तत्व दिसून येतं, असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज वाराणसीत काशी तामीळ संगमम महोत्सवात बोलत होते. काशी हे भारताचं सांस्कृतिक केंद्र असून काशी आणि तामिळनाडू यांच्यात वर्षोनुवर्ष रुजलेल्या विशेष नात्याचा हा उत्सव आहे, असं ते म्हणाले.    बनारस हिंदू विद्यापीठाच्या आय आयटीच्या विद्यार्थ्यांशी झालेल्या दुसऱ्या सत्रात जयशंकर म्हणाले की, राष्ट्रउभारणीत परंपरा आणि तंत्रज्ञान या दोन्हीची गर...

February 22, 2025 9:55 AM

views 96

जी-20 ने संपूर्ण जागतिक आव्हानांना अचूकपणे प्रतिबिंबित करण्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं आवाहन

जी-20 ने आपलं नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण जागतिक आव्हानांना अचूकपणे प्रतिबिंबित केलं पाहिजे असं आवाहन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं काल 2025 च्या जी-20 उद्दिष्टांवरील, जी-20 सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते.   सध्या अन्न, ऊर्जा आणि आरोग्य सुरक्षा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची उभारणी आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्रोत्साहन देणं ही आव्हानं आहेत. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथे जी-...

February 21, 2025 9:04 AM

views 94

पश्चिम आशियाई प्रदेशातील शांतता आणि स्थैर्य संपूर्ण जगासाठी आवश्यक- डॉक्टर एस.जयशंकर

सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती कठीण असून पश्चिम आशियाई प्रदेशातील शांतता आणि स्थैर्य संपूर्ण जगासाठी आवश्यक आहे,असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉकटर एस.जयशंकर यांनी व्यक्त केलं.ते काल दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये जी वीस (G20) परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते.   मतभेदाचं रूपांतर वाद आणि संघर्षात होऊ नये,तसंच संघर्षामुळे मोठे नुकसान होता कामा नये असंही जयशंकर यावेळी म्हणाले. दरम्यान, त्यांनी काल जोहान्सबर्गमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव यांची भेट घ...

January 12, 2025 8:20 PM

views 66

परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर उद्यापासून स्पेनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर उद्यापासून स्पेनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या भेटीत ते द्विपक्षीय संबध तसंच क्षेत्रीय आणि जागतिक घडामोडींवर त्यांचे स्पॅनिश समपदस्थ मॅन्युअल अल्बेरिस यांच्याशी चर्चा करतील.  ते स्पॅनिश राजदूतांच्या नवव्या वार्षिक परिषदेलाही ते संबोधित करतील तसंच भारतीय समुदायाशीही  संवाद साधतील.  परराष्ट्रव्यवहार मंत्री म्हणून त्यांची ही स्पेनला पहिलीच भेट आहे.  

January 8, 2025 10:26 AM

views 81

परराष्ट्र व्यवहार मंत्री कालपासून पाच दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर कालपासून पाच दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर असून, त्यांनी ओडिशाच्या पुरी आणि भुवनेश्वर इथल्या विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या.   जयशंकर यांनी कोनार्कच्या सूर्य मंदीर, जगन्नाथ मंदीर, धौली शांती स्तूप तसंच भुवनेश्वर इथं 11 व्या शतकातल्या लिंगराज मंदिरालाही भेट दिली. भुवनेश्वर इथं होणाऱ्या 18 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाला ते आज उपस्थित राहाणार आहेत.

January 4, 2025 2:50 PM

views 73

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्रमंत्री डॉ. अब्दुल्ला खलील यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा

भारताच्या दौऱ्यावर आलेले मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ अब्दुल खलिल आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांच्या काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणानुसार आणि क्षेत्रातल्या सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धी अर्थात सागर या तत्वानुसार भारताचे मालदीव सोबतचे संबंध अतिशय महत्वाचे असल्याचं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. भारत हा नेहमीच संकटकाळी मदत करणारा पहिला देश असून भारतानं मालदीवला कठीण प्रसंगी केलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल खालिल यांनी आभार मानले. भारताच्या...