September 21, 2024 3:02 PM

views 65

लोककल्याणकारी योजनांसाठी १५ लाख कोटी रुपयांची तरतूद – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत लोककल्याणकारी योजनांसाठी १५ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितलं. तामिळनाडू मधल्या थुथुकुडी इथं आज ते बोलत होते. पायाभूत सुविधांसाठी तीन लाख कोटी तसंच रेल्वेच्या विकासासाठी ६३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.    

August 22, 2024 7:42 PM

views 57

डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल सरकार ठोस कारवाई करत नसल्याचा केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांचा आरोप

आरजी कर रुग्णालयलामधल्या डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल सरकार ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी केला आहे. महिला डॉक्टरांना योग्य सुरक्षा पुरवण्याबाबतचे परिपत्रक केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या वतीन आरोग्य मंत्रालयानं पाठवलं असल्याचं त्यांनी तामिळनाडूत नागरकोइल इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं. श्रीलंकेच्या तुरुंगात असलेल्या भारतीय मच्छिमारांबद्दल बोलताना मुरुगन म्हणाले की, केंद्र सरकार मच्छिमारांच्या सुटकेसाठी पावलं...

August 2, 2024 2:14 PM

views 61

खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती ही समाजातली अपप्रवृत्ती असून तिला वेळीच आळा घालणं अत्यावश्यक आहे – डॉ. एल. मुरुगन

खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती ही समाजातली अपप्रवृत्ती असून तिला वेळीच आळा घालणं अत्यावश्यक आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी आज राज्यसभेत सांगितलं. या संदर्भातल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयाअंतर्गत २०१९ मध्ये सुरु केलेल्या तथ्य तपासणी विभागानं आतापर्यंत ९ हजार ९२२ संदेश बनावट बातम्या म्हणून उघड केले आहेत. असं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारशी संबंधित कोणत्याही बातम्यांची शहानिशा करू...

June 19, 2024 1:12 PM

views 51

प्रधानमंत्री मोदी यांनी कल्याणकारी काम केल्यानं तिसऱ्यांदा शपथ घेतली – राज्यमंत्री डॉ.एल मुरुगन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला, युवक आणि गरीबांच्या कल्याणासाठी भरीव काम केल्यानं सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली, असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी सांगितलं. तामिळनाडूतल्या तिरुवन्नलमलाईमध्ये ते बातमीदारांशी बोलत होते.   नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर सर्वात आधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा सतरावा हप्ता वितरीत केल्यानं शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत  झाल्याचं मुरुगन यांनी सांगितलं. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीच्...