November 1, 2024 2:08 PM

views 84

जगभरातील अनेक देशांमध्येही दिवाळीचा सण उत्साहात साजरा

जगभरात अनेक देशांमधे दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. अमेरिका, इंग्लंडसह संयुक्त अरब अमिरातीमध्येही दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून या भारतीय उत्सवाने देशभरातल्या सर्व समुदायांना सामावून घेतल्याचं चित्र दिसत आहे.   स्थानिकरित्या 'मिनी इंडिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बर-दुबईमध्ये दिवाळीचा उत्साह दिसत आहे. पारंपरिक वस्तूंच्या खरेदी बरोबरच सोन्याच्या बाजारातही लक्षणीय गर्दी दिसून आली. अबू धाबी इथल्या मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली असून दिवाळीनिमित्त संपूर्ण अमिरा...

November 1, 2024 1:17 PM

views 50

शेअर बाजारातर्फे आज वार्षिक मुहूर्त सौद्यांचं विशेष सत्र आयोजित

लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारातर्फे आज वार्षिक मुहूर्त सौद्यांचं विशेष सत्र आयोजित केलं जाणार आहे.   या विशेष सत्राबरोबरच नवीन कॅलेंडर वर्ष, संवत 2081ची सुरुवात होणार आहे. आज संध्याकाळी पावणे सहा ते सहा या दरम्यान आरंभपुर्व तर संध्याकाळी सहा ते सात या वेळेत नियमित सत्र होतील असं एन एस ई च्या निवेदनात म्हंटलं आहे.

November 1, 2024 10:10 AM

views 99

दीपावलीच्या प्रकाश पर्वानिमित्त देशभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण

दीपावलीच्या प्रकाश पर्वानिमित्त देशभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी आकाश कंदील, पणत्या, विजेच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई, रांगोळ्या, या बरोबरीनं अभ्यंग स्नान, फराळाच्या पदार्थांची मेजवानी असं चैतन्याचं वातावरण आहे.   आज संध्याकाळी होणाऱ्या लक्ष्मी पूजनासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. दिवाळीच्या निमित्तानं अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजनही ठीक ठिकाणी केलं जात आहे. महाराष्ट्रात पुणे मुंबईसह सर्वच शहरात दिवाळी पहाट कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे.

October 29, 2024 1:23 PM

views 79

देशभरात धनत्रयोदशीचा उत्साह; प्रधानमंत्र्यांच्या देशवासियांना शुभेच्छा

देशभरात आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी साजरी होत आहे. आजच्या दिवशी धनाची आणि धानाची तसंच देवांचे वैद्य असलेल्या धन्वंतरींची पूजा आज केली जाते. धणे आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान धन्वंतरींच्या कृपेमुळे सर्वांना आयुष्य, आरोग्य, आनंद आणि समृद्धी लाभो अशी मी कामना करतो, असं मोदी त्यांच्या समाज माध्यमावरच्या शुभेच्छा संदेशात म्हणाले आहेत. आज साजऱ्या होणाऱ्या आयुर्वेद दिनानिमित्तही प्रधानमंत्र्यांनी स...

October 29, 2024 1:04 PM

views 81

धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात घट

देशांतर्गत सराफा बाजारात आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत प्रतितोळा ५०० रुपयांची घट झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ८० हजारांवरून घसरून ७९ हजार ७९० रुपये झाली आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७३ हजार १४० रुपये झाला आहे. चांदीच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नसून चांदीचा दर ९७ हजार ९०० रुपये प्रतिकिलो इतका आहे.

October 28, 2024 3:16 PM

views 88

दीपावलीच्या मंगलपर्वाला वसुबारसपासून प्रारंभ

देशभरात दीपावलीच्या मंगलपर्वाला आज, गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसेपासून प्रारंभ झाला. आज, गायवासराची पूजा करून दिवाळीची सुरुवात होईल. येत्या रविवारपर्यंत चालणाऱ्या या प्रकाशोत्सवानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र चैतन्याचं वातावरण आहे. मनोवेधक रोषणाईनं बाजारपेठा सजल्या आहेत. आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या या बरोबरच कपडे, दागिने खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे.

October 20, 2024 1:20 PM

views 93

दिवाळी आणि छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेकडून ५७० विशेष फेऱ्या

दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं ५७० विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. १३२ फेऱ्या मुंबईहून, तर १४६ फेऱ्या पुण्याहून निघणार आहेत. तर १०८ फेऱ्या लातूर, सावंतवाडी, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी पोचणार आहेत. या रेल्वेंमध्ये वातानुकूलित, शयनयान आणि सर्वसाधारण डब्यांचा समावेश आहे. दक्षिणेकडच्या करीमनगर, कोचुवेल...

October 15, 2024 7:41 PM

views 71

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या वर्षीच्या दिवाळीनिमित्त २९ हजार रुपये बोनस जाहीर केला आहे. यासोबतच, अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळेतले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, महानगरपालिका प्राथमिक शाळेतले तसंच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतले शिक्षण सेवक, माध्यमिक शाळेतले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण सेवक, अधिव्याख्याते यांनाही बोनस दिला जाणार आहे.  सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त १२ हजार रुपये तर बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांना ५ हजार रुपये भाऊबीज भेट द...