July 11, 2025 5:31 PM

views 90

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्यप्रणाली द्वारे विविध सरकारी विभागांतल्या नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण करणार आहेत. यावेळी ते त्यांना संबोधितही करणार आहेत. देशभरात ४७ ठिकाणी हा रोजगार मेळा आयोजित केला जाणार आहे. रोजगार मेळ्यांद्वारे आजवर १० लाखांहून अधिक नियुक्ती पत्रं जारी केली आहेत.