February 20, 2025 7:53 PM

views 51

धुळ्यात १०० दिवसांच्या ई ग्राम संवादाला सुरुवात

धुळे जिल्ह्यात शंभर दिवसांच्या ई ग्राम संवादाला आजपासून सुरुवात झाली. दूरदृश्य प्रणालीद्वारे या संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हास्तरावरील अधिकारी नागरिक आणि प्रशासनाशी संवाद साधतील. तसंच गावातल्या तक्रारी, शासकीय योजनांची अंमलबजावणी याची माहिती घेऊन त्याचं निराकारण १५ दिवसांत करतील. 

February 20, 2025 3:25 PM

views 56

धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचं कामबंद आंदोलन

रखडलेली बिलं अदा करावीत या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं आज कामबंद आंदोलन केलं. ठेकेदारांची दोन ते तीन वर्षांची कोट्यवधींची बिलं रखडली आहेत, ८० ते १०० टक्के काम करूनही शासनाकडून केवळ ८ ते १० टक्के निधी मिळतो असं संघटनेनं म्हटलं आहे. मागणी मान्य झाली नाही तर सर्व कामं बंद करू, असा इशारा संघटनेनं म्हटलं आहे.

February 14, 2025 7:32 PM

views 78

धुळ्यातल्या अनेर डॅमचा विकास होणार

धुळे जिल्ह्याच्या  शिरपूर तालुक्यातल्या अनेर डॅम या निसर्गसंपन्न स्थळाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबतचा विकास आराखडा सादर करण्याच्या सुचना वन्यजीव विभागाला दिल्या आहेत. या पर्यटन स्थळात  पॅगोडा, टेहळणी टॉवर, टेन्ट हाऊस, बोंटीग, साहसी खेळ आणि ट्रेकींगसारख्या सुविधा उपलब्ध असाव्यात असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलं आहे. त्याव्यतिरिक्त देशी प्रजातीचे वृक्ष आणि बांबु लागवडीच्या सुचनाही  जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 

January 8, 2025 3:38 PM

views 59

धुळ्यात एका वाहनासह ७७ लाख २० हजार रुपये किंमतीचा बनावट मद्यसाठा जप्त

धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात म्हसदी इथं पोलिसांनी एका वाहनासह ७७ लाख २० हजार रुपये किंमतीचा बनावट मद्यसाठा जप्त केला आहे. हा मद्यसाठा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशानं म्हसदी गावातल्या जयेश गुंजाळ यानं आणला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी गुंंजाळविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

January 7, 2025 7:23 PM

views 62

धुळे इथं मुलांसाठी चाचा नेहरु बाल महोत्सवाचं उद्धाटन

महिला आणि बाल विकास विभागा अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल धुळे इथं काळजी तसचं संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी आणि मुलांसाठी चाचा नेहरु बाल महोत्सवाचं उद्धाटन आज झालं. यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून गुरुवारी महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचं वाचन करण्यात आलं. 

December 23, 2024 6:31 PM

views 45

धुळ्यात एका लॉज मधून चौघा बांगलादेशी नागरीकांना अटक

धुळे शहरातील एका लॉज मधून चौघा बांगलादेशी नागरीकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. वैध कागदपत्राशिवाय बेकायदेशिररित्या हे चार जण राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या चौघांविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

December 16, 2024 3:40 PM

views 59

धुळ्यात मांजा विक्रेत्यांवर पर्यावरण कायद्यानुसार १२ गुन्हे दाखल

धुळे शहर आणि धुळे ग्रामीण या भागातल्या मांजा विक्रेत्यांवर पर्यावरण कायद्यानुसार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत १२ गुन्हे दाखल झाले आहेत. प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूंपासून बनवलेल्या नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री, साठवणूक आणि वापरास संपूर्ण धुळे जिल्हयात बंदी  आहे, त्यामुळे मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर  ही कारवाई करण्यात आली आहे.

November 27, 2024 7:45 PM

views 107

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक ठराव मंजूर

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी बालविवाह प्रतिबंधक ठराव मंजूर केले. गावकऱ्यांनी बालविवाह होणार नाही अशी सामुहिक प्रतिज्ञा ग्रामसभांमध्ये घेतली. या ग्रामसभांमध्ये शाळांचे मुख्याध्यापक, आशा स्वयंसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलिस पाटील, गावातील राजकीय, सामाजिक पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.   गडचिरोली जिल्हा प्रशासन, जिल्हा महिला आणि बाल विकास विभाग तसंच ‘स्पर्श’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत गडचिरोली श...

November 6, 2024 3:27 PM

views 80

धुळ्यात ८ नोव्हेंबरला विनापरवाना ड्रोन उडवण्यास प्रतिबंध

धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा धुळ्यात येत आहेत. धुळ्यात मालेगाव रोड, महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राजवळ पांझरापोळ गोशाळा इथं प्रधानमंत्री येणार आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने परवा म्हणजे ८ नोव्हेंबरला या भागात विनापरवाना ड्रोन उडवण्यास प्रतिबंध घालणारा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.

October 23, 2024 3:49 PM

views 62

धुळे जिल्हा पोलीस दलाची मोठी कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं धुळे जिल्हा पोलिस दलानं धुळे जिल्ह्यात विशेष मोहिम राबवून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ६ पिस्तुलं, ८ जिवंत काडतुसं, १६ तलवारी, १ कोयता, गुप्ती अशी घातक शस्त्रे याच्यासह विदेशी, देशी मद्यसाठा, अंमली पदार्थ, गांजा, गुटखा मोठ्या प्रमाणात जप्त केले आहेत. पोलिसांनी १७ फरार आरोपींना अटक केली असून २४ लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. ही माहिती धुळे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज दिली.