December 30, 2025 8:45 PM

views 166

उमेदवारांची AB फॉर्म मिळवण्यासाठी चढाओढ, उमेदवारांमध्ये अखेरपर्यंत संभ्रम

मुंबई महानगर क्षेत्रासारखंच चित्र थोड्याफार फरकानं राज्याच्या इतर भागातही दिसून येतंय. पुण्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानं महानगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे.     नाशिकमधे भाजप स्वबळावर निवडणूक लढेल, अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी आज केली. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजपामधल्या इच्छुकांची एबी फॉर्म मिळवण्यासाठी चढाओढ लागली होती. एबी फॉर्म देण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून दोन कोटी रुपये घेतले जात असल्याचा आरोप काही जणांनी केला. याची चौकशी ...

December 26, 2025 6:00 PM

views 113

धुळे महापालिका निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढत देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी

धुळे महापालिका निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी असल्याचं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री अनिल पाटील यांनी धुळ्यात स्पष्ट केलं. प्रत्येक प्रभागातून सक्षम उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली असली तरी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव, आणि सन्मान जनक जागा भाजपानं दिल्या तरच युती करुन निवडणुका लढवायला पक्ष अनुकूल आहे. मात्र प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या इतकी मोठी असल्यानं पुरेशा जागा देणं अवघड होतं, असं ते म्हणाले. धुळे महापालिकेसाठ...