November 24, 2025 8:38 PM

views 330

सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन

सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते.  काही दिवसांपूर्वी त्यांना प्रकृतीअस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह निकटवर्तीय उपस्थित होते.    ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ३०० हून जास्त चित्रपटांमधे भूमिका करणारे धर्मेंद्र यांनी १९६० मधे दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून...

November 12, 2025 1:27 PM

views 84

ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचं मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आज सांगितलं. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, माध्यमांनी आणि जनतेने अफवांपासून दूर राहावं आणि आपल्या कुटुंबाचा खासगीपणा जपावा, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सर्वांचं  प्रेम आणि शुभेच्छा याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.