July 17, 2024 3:26 PM

views 57

गडचिरोली जिल्हा भविष्यात राज्यातला अग्रेसर जिल्हा असेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली जिल्हा हा भविष्यात राज्यातला सर्वात अग्रेसर जिल्हा असेल असा विश्वास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या प्रकल्पाचं भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते गडचिरोली इथं झालं त्यावेळी ते बोलत होते. अहेरी तालुक्यात वडलापेठ इथं साडेतीनशे एकर जागेवर १० हजार कोटी रुपयांचा हा पोलाद प्रकल्प उभा राहाणार आहे.

July 7, 2024 7:09 PM

views 52

वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ – ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस

ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली वीज कंपन्यांतल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथी गृहात ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालच्या वीज कंपन्यांतल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत ते आज बोलत होते.   या वीज कंपन्यात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट...

July 4, 2024 3:10 PM

views 46

राज्य पोलीस दलात ८१ पदांच्या नियमित भरतीच्या प्रक्रियेला मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेली पदं ही तांत्रिक आहेत. एकीकडे ही तात्पुरती भरती ११ महिन्यांसाठी करत असतानाच दुसरीकडे ८१ पदांच्या नियमित भरतीच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे, उर्वरित पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरू आहे, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिलं. आमदार रमेश पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. भारतीय तटरक्षक दल, नौदल अशा यंत्रणांमधून सेवानिवृत्त झालेल्यांची भरती कंत्राटी तत्त्वावर करण्यात आली आहे, असं...

June 28, 2024 7:25 PM

views 73

‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ असा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अतिशय प्रगतिशील, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केली.    शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा क्रांतीकारक निर्णय घेत बळीराजाच्या कष्टाचा आदर आणि सन्मान या अर्थसंकल्पात केल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं.

June 23, 2024 7:21 PM

views 48

नागपूर : आशा स्वयंसेविकांना मोबाईल फोनचं वितरण

नागपूरमध्ये १३ तालुक्यातल्या आशा स्वयंसेविकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मोबाइल फोनचं वितरण केलं. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण प्रतिष्ठानच्या सौजन्यानं आशा सेविकांना मोबाईल फोन सुविधेच्या्ानाल्ीो माध्यमातून अधिक सक्षमीकरणाचा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत १ हजार ९१० आशा सेविकांना मोबाईल फोन दिले जाणार आहेत. यानिमीत्त देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

June 23, 2024 7:16 PM

views 75

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात क्रमांक पटकावणाऱ्या शाळा बक्षिस वितरण

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात नागपूर जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या शाळांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बक्षिसं देण्यात आली. देवगिरी या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशीष जायस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.                

June 19, 2024 3:47 PM

views 50

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचं नेतृत्त्व करतील – चंद्रशेखर बावनकुळे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपाचे नेते असून तेच राज्याचं नेतृत्त्व करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूर विमानतळावर बातमीदारांशी बोलत होते. सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती भाजपाच्या सर्व आमदारांनी आणि पक्ष सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.   केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी आखलेल्या सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोचवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेच्या निवडणुक...