July 19, 2025 8:05 PM

views 56

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाचं उद्घाटन

ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाचं उद्घाटन आज ठाण्याच्या कोरस आरोग्य केंद्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या अभियानाअंतर्गत पुढच्या ३ महिन्यात ५ लाख महिलांची वैद्यकीय तपासणी विनामूल्य करण्यात येणार आहे. विशेषतः गर्भाशयमुखाचा कर्करोग, मधुमेह, हिमोग्लोबिन या तपासण्या या अभियानात होणार असून ९ ते १४ वर्ष वयोगटातल्या मुलींसाठी एचपीव्ही लस उपलब्ध असेल. गर्भाशय मुख कर्करोगाच्या निदानासाठी आवश्यक साधनसामुग्रीकरता नगरविकास विभाग ठाणे महान...

June 3, 2025 7:29 PM

views 71

राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचं अपघाती विमा कवच लागू करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केली. सह्याद्री अतिथीगृहात एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर या महिन्यापासून ४६ टक्क्यांऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफ...