June 13, 2025 7:19 PM

views 18

मोबाईल ग्राहकांना प्रीपेडमधून पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये बदलणं सोपं जाणार

दूरसंचार विभागाने सिम कार्डाशी संबंधित नियमांमध्ये बदल केला असून त्यानुसार मोबाईल ग्राहकांना प्रीपेडमधून पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये बदलणं सोपं जाणार आहे. दूरसंचार विभागाने प्रक्रियेसाठी लागणाऱ्या ९० दिवसांच्या कालावधीत कपात केली असून हा कालावधी आता ३० दिवसांचा असेल. तसंच या नवीन नियमांनुसार, एकदा बदल केल्यानंतर संबंधित सेवेत उपलब्ध असलेले प्लॅन्स ग्राहकाला आवडले नाहीत तर केवळ ३० दिवसांत पुन्हा बदल करता येईल. मात्र ही सवलत फक्त एकदाच मिळू शकेल.