November 30, 2025 7:44 PM

views 86

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने हा एफआयआर नोंदला आहे. काँग्रेसचे अन्य नेते सुमन दुबे, सॅम पित्रोदा यांच्यासह एकूण ९ जणांविरुद्ध  कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई खोडसाळ पणाची असून केवळ काँग्रेस नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी केली जात असल्याची टीका पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.

November 13, 2025 1:37 PM

views 83

दिल्ली स्फोटातल्या हल्लेखोराची ओळख पटली

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवणारी व्यक्ती डॉ. उमर उन नबी असल्याचं डीएनए चाचणीतून स्पष्ट झालं आहे. स्फोटानंतर त्याचा पाय स्टीअरिंग व्हील आणि अ‍ॅक्सिलरेटरमध्ये अडकला होता. त्याचा डीएनए नमुना त्याच्या आईशी जुळला असल्याची माहिती, दिल्ली पोलिसांनी दिली.   दरम्यान, दिल्ली मेट्रोचं लाल किल्ला स्थानक सुरक्षेच्या कारणास्तव पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील असं मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कळवलं आहे. या तपासादरम्यान, अलफलाह विद्यापीठाच्या आवारातून आज आणखी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. हे वाहन, संशयित...

May 30, 2025 10:17 AM

views 80

दिल्लीत ९०० बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवण्यात यश

राजधानी दिल्लीत राहणाऱ्या सुमारे 900 बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवण्यात आली असून योग्य पडताळणीनंतर त्यांना परत पाठवलं जाणार असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कागदपत्रं नसलेल्या स्थलांतरितांना परत पाठवण्याची प्रक्रिया अधिक वेगवान झाली आहे.   सध्या सुरू असलेल्या भारत सरकारच्या 'पुश-बॅक' धोरणांतर्गत गेल्या ६ महिन्यांत दिल्लीतील सुमारे 700 बेकायदेशीर स्थलांतरितांना बांगलादेशला परत पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्...

February 16, 2025 1:32 PM

views 56

दिल्ली पोलिस विभागाचा ७८वा स्थापना दिन

दिल्ली पोलिस विभागाचा ७८वा स्थापना दिन म्हणजेच रायझिंग डे आज  उत्साहात पार पडला. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्या उपस्थितीत पोलिसांनी राय यांना मानवंदना दिली.  देशातील सर्वोत्तम पोलीसदलात दिल्ली पोलिसांचा समावेश होतो असं राय यांनी यावेळी सांगितलं. जी ट्वेंटी शिखर परिषद तसंच कोविड महामारीच्या काळात दिल्ली पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यानी प्रशंसा केली. सायबरगुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी भारतीय सायबरगु...

January 2, 2025 8:30 PM

views 81

बांगलादेशी नागरिकांचे भारतात बेकायदेशीर स्थलांतर करणारी टोळी उघडकीस

बांगलादेशी नागरिकांचे भारतात बेकायदेशीर स्थलांतर करणारी एक टोळी दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणली आहे. पोलिसांनी दोन बांगलादेशी नागरिक आणि त्यांना मदत करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून बनावट कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. गेल्या महिन्यात १२ बांगलादेशी नागरिकांना परत पाठवण्यात आलं असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. 

December 7, 2024 7:42 PM

views 60

आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीच्या कारवाईत दिल्ली पोलिसांकडून एकाला अटक

दिल्ली पोलिसांनी आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीच्या कारवाईत एकाला अटक केली असून दोन किलोहून अधिक उच्च प्रतीचा चरस जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या 'नशामुक्त भारत' अभियानांतर्गत गेल्या १५ दिवसांत सुमारे ५५ किलो गांजा, ७ हजार ८०० क्वार्टर अवैध दारू, दोन किलोहून अधिक चरस आणि ११ ग्रॅम स्मैक जप्त करण्यात आली आहे.

August 22, 2024 7:39 PM

views 55

दिल्ली पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबधित १४ जणांना अटक

दिल्ली पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकानं देशभरात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबधित १४ जणांना अटक करण्यात आली असून शस्त्रात्रही जप्त करण्यात आली आहेत. झारखंडच्या रांची इथल्या डॉ. इश्तियाक नामक हा मुख्य आरोपी असून विविध ठिकाणी मोठ्या दहशतवादी कारवाया करण्याची त्याची योजना असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

July 30, 2024 8:45 PM

views 55

दिल्लीत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस

दिल्लीत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिल्लीचे मुख्य सचिव, दिल्ली पोलीस आयुक्त आणि दिल्ली महानगरपालिकेच्या आयुक्तांना नोटिस बजावली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल दोन दिवसात सादर करावा असं यात म्हटलं आहे. तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दिल्लीतल्या कोंचिंग सेंटर्स आणि संस्थांची संख्या जाणून घेण्यासाठी दिल्लीच्या मुख्य सचिवांनी सखोल सर्वेक्षण करावं असं आयोगानं म्हटलं आहे.