February 4, 2025 8:08 PM

views 67

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान होत आहे. सकाळी सात ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात असून १ कोटी ५६ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असून, निवडणूक आयोगानं १ लाख ८० हजारापेक्षा जास्त कर्मचारी तैनात केले आहेत.    गेल्या २४ तासांत पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत १४ जणांना अटक केली असून २५ जणांविरोधात FIR दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्...

January 30, 2025 7:00 PM

views 45

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांचा प्रचार जोरात सुरू

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांचा प्रचार जोरात सुरू आहे. महत्वाच्या पक्षांचे मोठे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सभा, रोड शो, आणि रॅली काढत आहेत.    भाजपाचे ज्य़ेष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रोहिणी आणि वझिरपूर  भागात प्रचारसभांना संबोधित केलं. भाजपा सत्तेवर आल्यावर महिलांना अडीच हजार रुपये प्रतिमाह देण्यात येतील असं आश्वासन शहा यांनी दिलं. प्रत्येक गरोदर महिलेला २१ रुपये मदत दिली जाईल, तसंच घरगुती गॅस सिलिंडर पाच हजार रुपयांत उपलब्ध करून दिला जाईल, असंही शहा म्हणाल...

January 20, 2025 7:44 PM

views 39

Delhi Election : आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३९७ गुन्हे दाखल

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत ३९७ गुन्हे दाखल केले आहेत. एका निवेदनाद्वारे दिल्ली पोलिसांनी आज ही माहिती दिली. एका निवेदनात, 212 विना परवाना शस्त्रं, सुमारे 36 हजार लिटर दारू आणि 15 कोटी रुपये किमतीचे सुमारे 75 किलोग्राम ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत, प्रतिबंधात्मक कारवाई आणि इतर कायद्यांतर्गत पोलिसांनी 14 हजारांहून अधिक लोकांना अटक केली आहे, असंही या निवेदनात म्हटलं आहे.

January 10, 2025 8:01 PM

views 44

दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. तर २० जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येतील. या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

December 23, 2024 1:17 PM

views 51

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचं दिल्ली सरकारविरुद्ध आरोपपत्र जारी

दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आज दिल्ली सरकारविरुद्ध आरोपपत्र जारी केले. सत्ताधारी आप सरकारनं नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केले नाहीत असा आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नेते  अनुराग ठाकूर, दिल्ली भाजपचे प्रमुख विरेंद्र सचदेवा आणि अन्य काही नेत्यांनी यासंदर्भातील पुरावे सादर केले आहेत. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना खोटी आश्वासनं देत त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला आहे. यमुना नदीत होणारं प्रदूषण, दिल्लीतील हवेची ढासळती गुणवत्ता, भ्रष्टाचारासह अने...

December 13, 2024 10:58 AM

views 46

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने 21 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली आहे. पक्षाने बादली विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून संदीप दीक्षित, बल्लीमारन मतदारसंघातून हारून युसूफ, वजीरपूरमधून रागिणी नायक, सीलमपूरमधून अब्दुल रहमान आणि सदर बाजार विधानसभा मतदारसंघातून अनिल भारद्वाज यांना उमेदवारी दिली आहे.