August 4, 2026 1:35 PM

views 50

महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरु करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरु करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यांपासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.   राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थमुक्...