April 22, 2025 9:00 PM

views 55

पहिली ते पाचवीसाठी हिंदी भाषा अनिवार्य ऐवजी ऐच्छिक-दादाजी भूसे

राज्यातल्या पहिली ते पाचवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य नव्हे तर ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भात तज्ञांशी चर्चा करुन लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मंत्रालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत दिली. राष्ट्रीय शिक्षण धोरणात ३ भाषा धोरण सुचवलं आहे. त्यानुसार हा निर्णय घेतला आहे पण यासाठी केंद्राची सक्ती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सुकाणू समिती, राज्यभरातले तज्ञ, विविध शिक्षण तज्ञ यांच्याशी चर्चा...

March 23, 2025 7:37 PM

views 50

शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याविषयीची माहिती येत्या दोन दिवसांत देणार-दादा भुसे

राज्यातल्या शासकीय शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याविषयीची संपूर्ण माहिती येत्या दोन दिवसांत विधानसभेत दिली जाणार आहे, असं  शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. नाशिकमध्ये ते आज बातमीदारांशी बोलत होते. सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबतचे गैरसमज दूर केले जातील. त्यानंतर या अभ्यासक्रमाचं सर्व  स्तरात स्वागत होईल, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला. 

June 29, 2024 7:25 PM

views 51

जनतेला विश्वासात घेऊन राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल – मंत्री दादा भुसे

जनतेला विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल,अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत दिली. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं सांगत हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे सतेज पाटील यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती. त्याला भुसे यांनी उत्तर दिलं.  शहरं विद्रुप करणाऱ्या बेकायदेशीर जाहिरात फलकांना चाप लावण्यासाठी आवश्यकता भासल्यास कायद्यात बदल केला जाईल, त्यासाठ...