October 5, 2025 1:24 PM

views 23

फिट इंडिया संडेज ऑन सायकल मोहिमेच्या विशेष अंकात आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचा सहभाग

जागतिक शिक्षक दिनानिमित्त फिट इंडिया संडेज ऑन सायकल या मोहिमेच्या आजच्या विशेष अंकात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी भाग घेतला. नवी दिल्लीच्या ध्यानचंद स्टेडीयमपासून निघालेल्या या सायकल यात्रेत मोठ्या संख्येने शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. सायकल चालवणं ही आता लोकचळवळ बनली आहे, असं मांडवीय म्हणाले. या मोहिमेच्या संकल्पना - गीताचं प्रकाशन आज झालं.