May 9, 2025 9:52 AM

views 33

महाराष्ट्रात सायबर सुरक्षेसाठी अत्याधुनिक सुविधा असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

सायबर सुरक्षेसाठी देशातील अत्याधुनिक सुविधा महाराष्ट्रात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सायबरच्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स बॉट आणि सायबर जागरुकता माहितीपटाचं अनावरण काल मुंबईत झालं; त्यावेळी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हा चॅटबॉट महाराष्ट्र सायबरच्या 1945 या हेल्पलाईनशी जोडला असून सायबर गुन्ह्याबबत तक्रार कशी करावी, यासंबंधीची माहिती या चॅटबॉटमध्ये मिळणार आहे.

April 7, 2025 3:11 PM

views 35

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार सायबर प्रयोगशाळांचं जाळं मजबूत करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार सायबर प्रयोगशाळांचं जाळं अधिकाधिक मजबूत करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत डी बी मार्ग पोलीस ठाण्यात सायबर प्रयोगशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. वरळी पोलीस ठाणे आणि गोवंडी पोलीस ठाण्यातल्या प्रयोगशाळांचं मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन उद्घाटन केलं. यासह मुंबई पोलिसांच्या इतर उपक्रमांचंही उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं.  त्यात मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन, अत्याधुनिक दुचाकी यांचा समावेश आहे.    या प्रयोगशाळा...

October 12, 2024 9:48 AM

views 62

महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सर्वोत्तम तंत्रज्ञानानं सज्ज असलेल्या महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पामुळे डिजिटल माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण कमी होईल तसंच जनतेमधली सायबर हल्ल्याची भीती कमी होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महा सायबर-महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचं उद्घाटन काल मुंबईत, फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सायबर गुन्ह्यांवरील त्वरीत कारवाईसाठीच्या 14407 या दूरध्वनी मदत क्रमांकाचा प्रारंभ या कार्यक्रमात करण्यात आला.   तंत्रज्ञान नेहमी बदलत राहतं, त्य...